भरदिवसा नदीजवळ तरुणाची बॉडी, लेकाच्या जाण्याने एकट्या माऊलीने आधार गमावला; हिंगोलीत हळहळ.

हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने त्याची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.हिंगोली जिल्ह्यात एका तरुणासोबत अतिशय भयंकर घटना घडली आहे. जिल्ह्यातील वसमत येथील मुसाफिर शहा जवळ असलेल्या माळीवाडा या भागातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. रविवारी, ११ मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणाच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.वसमत येथील माळीवाडाभागातील उघडी नदीच्या उसाच्या शेताजवळील एका वाळलेल्या झाडाखाली तरुणाचा मृतदेह आढळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृत तरुणाचा पंचनामा केला असता तरुणाचा धारदार शस्त्राने खून केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी तरुण नेमका कुठला आहे, त्याची ओळख पटवण्याची सुरुवात केली. मृतदेह हा शहर पेठ भागातील विश्वनाथ राजेंद्र कदम (२४) याचा असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. पोलिसांनी या हत्येप्रकरणी श्वानपथकाला देखील पाचारण केलं होतं, परंतु या भागात पाऊस झाल्याने श्वान पथकाला तपास करता आला नाही. ही हत्या कशामुळे झाली, याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.दरम्यान, २४ वर्षीय मृत तरुण विश्वनाथ याच्या पश्चात त्याच्या कुटुंबात केवळ त्याची आई असल्याचं बोललं जातं आहे.

एकुलत्या एका तरुणाच्या जाण्याने माऊली एकटी पडली असून तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तरुणाच्या हत्येची बातमी कळतात या परिसरात मोठी गर्दी जमली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस संशयितांची चौकशी करत असून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. तरुणाची हत्या नेमकी का झाली, हत्येमागे काय कारण होतं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.