वेगाने केला घात, भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद-फुलंब्री रस्त्यावर भीषण अपघात झाला. एका दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने वाल्मीक देवकर नावाच्या १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.दूध डेअरीकडून शेताकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खुलताबाद ते फुलंब्री रस्त्यावर येसगाव नंबर एक येथे घडली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वाल्मीक संतोष देवकर (राहणार किनगाव, तालुका फुलंब्री) असं अपघातात मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.

या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक देवकर हा येसगाव नंबर एक येथील दूध डेअरीवर गेला होता. या दूध डेअरीवरून तो शेताकडे दुचाकी (क्र. एमएच २० डी २९२८) ने जात होता. काही अंतरावर जाताच पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारणे वाल्मीक याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीचा चुराडा झाला तर कार खड्ड्यात जाऊन पडली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील वाल्मीक व चार चाकी चलक गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ वाल्मीक याला फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

वाल्मिकीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर गंभीर जखमी असलेल्या कारचालकाला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या भीषण अपघाताप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.