परिचारिकाचे अनोखे मिशन! क्षयरोग जागृतीसाठी भारत-नेपाळ दुचाकीने भ्रमंती; १३ दिवसांत ३ हजारांवर किमी प्रवास.

तेरा दिवसांत तब्बल ३,३२७ किलोमीटरचे अंतर मोटरसायकलने पूर्ण करणारा आकाश नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुरुष परिचारिका आहे.रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करताना येणाऱ्या अनुभवाचा समाजासाठी काही उपयोग व्हावा, या उद्देशाने नागपूरच्या आकाश अभय साळवे याने क्षयरोग जनजागृतीसाठी भारत आणि नेपाळमध्ये मोटरसायकलने भ्रमंती करून निरोगी राहण्याचा संदेश दिला. तेरा दिवसांत तब्बल ३,३२७ किलोमीटरचे अंतर मोटरसायकलने पूर्ण करणारा आकाश नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुरुष परिचारिका आहे.मेयो रुग्णालय क्षयरोग विभागात काम करणाऱ्या आकाशने या रुग्णांची स्थिती अनुभवली आहे. वेगाने वाढणारा हा गंभीर आजार असला तरी समाजात त्याबद्दल अजूनही जागृती नाही.

त्यामुळे सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि अखेरच्या टप्प्यात रुग्ण डॉक्टरांकडे येतात. मात्र, वेळेत निदान झाले तर यातून बरे होता येऊ शकते. मेयोतील वॉर्डात क्षयरुग्णांशी होणाऱ्या संवादातूनच त्याला या आजाराविषयी जनजागृती किती आवश्यक आहे हे ध्यानात आले व त्याने त्यासाठी मोटरसायकलने देशभर भ्रमंती करण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने या आजाराची माहिती देणारी एक छोटी पुस्तिका तयार केली व वाटेत थांबून तो लोकांना त्याविषयी सांगत फिरला. नागपुरातून निघाल्यावर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमधून मोटरसायकलने तो नेपाळमध्ये पोहोचला.

नेपाळमधील सोनौली, बुटवल, रामपूर, व्यास, बंदीपूर, बेसीसहर, चामे, मनांग व्हॅली, काठमांडू, ललितपूर, हेटौडा या सर्व ठिकाणी जाऊन लोकांना भेटत त्याने क्षयरोगासंबंधी काढलेली पुस्तिका वितरित केली तसेच लोकांना या आजाराविषयी सांगितले. आकाशने यापूर्वीही अशी मोटरसायकल भ्रमंती केली आहे. अलीकडेच, ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाने त्याचा गौरव केला होता. सुरक्षित आणि शिस्तबद्ध सायकलिंग संस्कृती वाढण्यासाठी कार्य करणाऱ्या ऑरेंज सिटी रायडर्स क्लबचा आकाश हा अध्यक्ष आहे.या पुस्तिकेत क्षयरोगाची लक्षणे, तपासणी, निदान, उपचार, रुग्णालय, क्षयरोग नियंत्रण केंद्र टोल फ्री क्रमांक अशी सर्व माहिती दिली होती. रुग्णसेवेत असताना ज्यांचा आजवर मृत्यू झाला, अशा परिचारिकांना यानिमित्ताने आपण आदरांजली वाहिली असल्याचे आकाशने ‘मटा’ला सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.