हेअर ट्रान्सप्लांटनंतर चेहरा सुजला, 37 वर्षीय इंजिनिअरचा तडफडून मृत्यू, MBBS डॉक्टरवर गुन्हा.

14 मार्च रोजी सकाळी तरुणाच्या पत्नीला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. विनीतच्या चेहऱ्यावर सूज आली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत, असे त्या व्यक्तीने सांगितले. पण तो कॉल लगेच कट झालाचुकीच्या हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेमुळे 37 वर्षीय सहाय्यक अभियंत्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश येथील कानपूरमध्ये मार्च महिन्यात ही घटना घडली होती. या घटनेनंतर मयत तरुणाच्या पत्नीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत FIR दाखल केला आहे. सहाय्यक अभियंता विनीत कुमार दुबे हे कानपूरजवळील पंकी पॉवर प्लांटमध्ये कार्यरत होते. ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत ऑफिसर्स कॉलनीत राहत होते.विनीत कुमार दुबे हे गोरखपूरचे रहिवासी होते. ते कानपूरच्या पंकी पॉवर प्लांटमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यांची पत्नी जया त्रिपाठी यांनी पोलिसांना सांगितले की, हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. जया त्रिपाठी आपल्या दोन मुलांसोबत गोंडा येथे त्यांच्या माहेरी गेल्या होत्या.

13 मार्च रोजी विनीतने कल्याणपूरमधील एका MBBS डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केले.जया त्रिपाठी यांच्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी सकाळी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. विनीतच्या चेहऱ्यावर सूज आली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत, असे त्या व्यक्तीने सांगितले. पण तो कॉल लगेच कट झाला. त्यानंतर जया यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन स्विच ऑफ होता. त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरलाही फोन केला, पण त्याचा फोनही बंद होता.जया यांनी त्यांच्या कानपूरमधील एका नातेवाईकाला विनीतला हॉस्पिटलमध्ये बघायला सांगितले. तोपर्यंत विनीतची तब्येत आणखी बिघडली आणि त्याला रिजेन्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे 15 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला.

जया त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर रावतपूर पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरने निष्काळजीपणे उपचार केल्यामुळे विनीतचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. आरोपी डॉक्टरवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 106 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमामध्ये निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास शिक्षेची तरतूद आहे, असे पोलिसांनी सांगितले.कल्याणपूरचे ACP अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले की, ज्या लोकांनी विनीतला डॉक्टरची ओळख करून दिली, त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावले, पण ते अजून आलेले नाहीत. “आमच्या तपासातून पुढील कारवाई निश्चित केली जाईल,” असे पांडे म्हणाले.पोलिसांनी सांगितले की, ते या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. डॉक्टरांचा निष्काळजीपणा आणि हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकांचा तपास केला जाईल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.