आंतरजातीय लव्ह मॅरेज, तरी नवऱ्याचं मैत्रिणीशी सूत; पुण्यात साठीतील दाम्पत्य घटस्फोटाच्या उंबऱ्यावर, एकच कमाल घडली…

राहुलचा जुन्या मैत्रिणीसोबतचा संवाद वाढल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सततच्या वादविवादाचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मुलाच्या मानसिक, शैक्षणिक व व्यावसायिक वाढीवर होऊ लागला.उतारवयात एकमेकांचा आधार होण्याऐवजी दुराव्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या वृद्ध जोडप्यातील दुरावा मिटविण्यात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या समुपदेशकांना यश आले आहे. पुण्यात राहणारी पत्नी व व्यवसायानिमित्त परदेशात असलेल्या पतीचे पुणे न्यायालयात शनिवारी झालेल्या लोकअदालतीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशन करण्यात आले. संवाद, समजूत आणि आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून या जोडप्याने आपल्या वैवाहिक नात्याची उसवणारी वीण पुन्हा घट्ट करण्याचा आणि वृद्धापकाळात एकमेकांना भावनिक आधार देण्याचा निर्धार केला.

राहुल आणि अंजली (दोघांची नावे बदलली आहेत) यांनी १९९५ मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला. मात्र, हुंडा आणि जुन्या चालीरीती-परंपरांबाबतच्या मतभेदांमुळे त्यांच्या नात्यात वादाची ठिणगी पडली. काही वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी राहुल परदेशात गेला. त्याच्या अनुपस्थितीत अंजलीला सासरच्या मंडळींकडून मानसिक व भावनिक त्रास सहन करावा लागला. त्यातच राहुलचा जुन्या मैत्रिणीसोबतचा संवाद वाढल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सततच्या वादविवादाचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मुलाच्या मानसिक, शैक्षणिक व व्यावसायिक वाढीवर होऊ लागला.

वयाच्या साठोत्तरीत पोहोचलेल्या या दाम्पत्याने सततचे वादविवाद थांबविण्यासाठी समुपदेशकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पत्नीने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे समुपदेशनासाठी अर्ज केला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या नेतृत्वात समुपदेशक प्रशांत लोणकर यांनी या दाम्पत्याचे समुपदेशन केले.दोघे वेगवेगळ्या देशात असतानाही ऑनलाइन पद्धतीने दोघांना एकत्र बसवून त्यांची समजूत घालण्यात आली. आपल्या वादविवादामुळे मुलाच्या आयुष्यावर झालेले परिणाम लक्षात घेऊन पती-पत्नीने समजूतदारपणा दाखविला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील समुपदेशनातून झालेल्या सकारात्मक संवादातून कुटुंब सावरल्याची भावना समुपदेशकांनी व्यक्त केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.