आढळरावांना आता खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अजितदादांच्या दोन शिलेदारांनी बांधला चंग.

शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊली कटके आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अतुल बेनके यांनी आपण आढळराव पाटलांना खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं म्हटलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदारकीची हॅट्रिक मारणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना 2019 आणि 2024 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सलग पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. 2019 ला एकसंध शिवसेनेतून आढळराव पाटलांनी निवडणूक लढवली होती. मात्र 2024 उजेडता उजेडता महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालती झाल्या आणि आढळराव पाटील, जे कट्टर शिवसैनिक होते त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवावी लागली. मात्र या निवडणुकीत सुद्धा आढळराव पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर आता आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा खासदार करणार असल्याचा चंग अजित पवार यांच्या दोन शिलेदारांनी बांधला आहे.

शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊली कटके आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अतुल बेनके यांनी आपण आढळराव पाटलांना खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं म्हटलं आहे. “शिवाजीराव आढळराव पाटील यांचे व्यक्तिमत्व वेगळेच आहे. पद असो किंवा नसो, समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे आढळराव कधी थकलेले दिसले नाहीत. त्यांची विकासकामे करण्याची धमक आणि संपर्क हा आम्हा आमदारांसाठी ऊर्जा स्त्रोत आहे. त्यांना पुन्हा खासदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही” असा निर्धार आमदार ज्ञानेश्वर (माऊली ) कटके यांनी व्यक्त केला. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे महाराष्ट्राचा हास्य मेळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.”आढळराव पाटील यांच्या रूपाने अपराजित योद्धा आपल्याला लाभला आहे.

परिस्थितीमुळे आढळराव पराभूत झाले, त्याला आम्हीही कारणीभूत आहोत. शिरूर लोकसभेला जबाबदार नेतृत्व हवे आहे. दादा कर्तव्यशील, कार्यशील असल्याने कुठल्याही परिस्थितीत त्यांना खासदार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही” असं माजी आमदार अतुल बेनके म्हणाले आहेत.दरम्यान, राजकारण हे समाजकारण करण्याचे क्षेत्र आहे. ज्यांनी मला लोकसभेला निवडून दिले, त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझ्यासाठी सत्ता, पद महत्त्वाचे नसून जनता महत्त्वाची असल्याचं आढळराव म्हणाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्याच्या राजकारणापासून अलिप्त झालेले आढळराव पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद पुन्हा वाढणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.