जुना वाद मिटवण्यासाठी तिघे एकत्र जमले, पण पुन्हा वाद पेटला अन् दोघांनी तरुणाला संपवले; नांदेड हादरले.

नांदेड शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. जुना वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या तिघांपैकी एकाने दोघांवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.नांदेड शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. जुना वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या तिघांपैकी एकाने दोघांवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी शहरात वसरणी भागातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक जीवंत काडतूसही सापडले आहे.शेख परवेज (वय २५) असे मृताचे नाव आहे.

तर तेजासिंग बावरी हा जखमी झाला असून त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धक्कादायक म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच शहरातील गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी दोघांवर गोळीबार केला होता. या गोळीबाराची चर्चा थंडावत असताना आज ११ मे ला सकाळी पुन्हा गोळीबाराची घटना घडली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आशु पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे याच्यासह शेख परवेज, तेजासिंग बावरी या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता.

प्रारंभी किरकोळ असलेला हा वाद टोकाला जाऊन यातून कमलेश लिंबापुरे उर्फ आशु पाटील याने शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यावर गोळी झाडली. यात शेख परवेज (वय २५) हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला तेजासिंग बावरी हा जखमी झाला.मयत शेख परवेज हा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला जीव गमवावा लागला. तीन महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या गोळीबारात जखमी झालेल्या तेजासिंग बावरी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.