उच्चशिक्षित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नराधमानं अत्याचार केला; पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम.

तब्बल एक डझन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाने त्यांचे शारीरिक शोषण केल्याची खळबळजनक घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.तब्बल एक डझन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाने त्यांचे शारीरिक शोषण केल्याची खळबळजनक घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचारसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. अर्जुन राजेंद्र कनोजे (३०, रा. कामठी) असे अटक तरुणाचे नाव आहे.वृत्तानुसार, रिया ही तरुणी उच्चशिक्षत आहे. ती एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पाच वर्षांपूर्वी तिला कळमेश्वरमध्ये प्लॉट खरेदी करायचा होता.

यावेळी अर्जुन हा एका कंपनीसाठी प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचा. मित्राच्या माध्यमातून तिची अर्जूनसोबत ओळख झाली. अजुर्नने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहित असतानाही त्याने अविवाहित असल्याचे रियाला सांगितले.१८ डिसेंबर २०२४ ला त्याने रियाला रामटेक परिसरात आयो हॉटेलमध्ये नेले. नंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. रियाने नकार दिला, पण अर्जुनने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने रियाचे आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रफित काढली. त्याआधारे तो तिला ब्लॅकमेल करायला लागला. तिच्याकडून खंडणी उकळून अर्जुनने कारही खरेदी केली. काही दिवसांपूर्वी ती अर्जुनच्या घरी गेली. अर्जुन हा विवाहित असल्याचे तिला कळाले. तिने त्याच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणले.

अर्जुनने रियाला छायाचित्र व चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली.रियाने त्याच्याबाबत माहिती काढली असता अर्जुनने तब्बल १२ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक शोषण केले. तरुणींकडून लाखो रुपयांची खंडणी उकळली, असे रियाला समजले. रियाने कन्हान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करून अर्जुनला अटक केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.