ईडीची बीडमध्ये मोठी कारवाई; ‘ज्ञानराधा’ घोटाळाप्रकरणी तब्बल १८८ कोटींच्या मालमत्तेवर टाच.

मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यानुसार केलेल्या कारवाईत १८८.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात संस्था जमिनी, इमारती, कारखाने यांचा समावेश आहे. राज्यातील चार लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ज्ञानराधा मल्टिस्टेटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीसंबंधित (डीएमसीएसएल) बीडमधील विविध संस्थांवर छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यानुसार केलेल्या कारवाईत १८८.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात संस्था जमिनी, इमारती, कारखाने यांचा समावेश आहे.

डीएमसीएसएलचे व्यवस्थापन आणि नियंत्रण असलेल्या सुरेश कुटे आणि सहकाऱ्यांनी सोसायटीच्या मदतीने मुदत ठेवींवर १२ ते १४ टक्के व्याजदराचे आमिष दाखवले. प्रत्यक्षात ठेवींची मुदत पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही. यामुळे सोसायटीशी संबंधित व्यक्तींविरोधात मे ते जुलै २०२४ दरम्यान राज्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे.

डीएमसीएसएलच्या व्यस्थापनाने राज्यातील गुंतवणूकदारांच्या निधीचा अपहार केला आहे. सुरेश कुटे आणि सहकाऱ्यांनी अंदाजे २,४६७ कोटी रुपयांचा निधी बेकायदा आणि फसवणूक करून वळता केला.इंडीने सर्वप्रथम ९ ऑगस्ट २०२४ मध्ये कारवाई करत ११ कोटींची संपत्तीवर टाच आणली. त्यानंतर २४ सप्टेंबरला ८५.८८ कोटी, ९ ऑक्टोबर रोजी १,००२.७९ कोटी, ५ नोव्हेंबर रोजी ३३३.८२ कोटींच्या जागांवर जप्तीची कारवाई केली. सद्यस्थितीत डीएमसीएसएलप्रकरणी एकूण १,६२१.८९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. डीएमसीएसएलचे व्यवस्थापन करणाऱ्या सुरेश कुटे याला ७ जानेवारी २०२५ला अटक केली असून तो सध्या न्यायालयाने कोठडीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.