बालीमध्ये शाळेच्या सहलीवेळी बोट उलटून अपघात, कल्याणमधील शिक्षिकेचा मृत्यू, पाठक कुटुंबासह शाळेवर शोककळा.

कल्याणच्या बिर्ला स्कूलच्या १८ विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक दरवर्षीप्रमाणे यंदा बाली इथे सहलीसाठी गेले होते. ९ मे रोजी बाली येथे रिव्हर राफ्टिंग करताना श्वेता यांची बोट बुडाली.इंडोनेशियामधील बाली येथे शैक्षणिक सहल घेऊन गेलेल्या कल्याणमधील बिर्ला स्कूलच्या शिक्षिका श्वेता पाठक यांचा रिव्हर राफ्टिंगदरम्यान बोट उलटल्याने मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांनी ही माहिती दिली.पाठक यांचे नातेवाईक आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी बाली येथे रवाना झाले असून त्यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी नातेवाइकांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला मदतीची विनंती केली आहे.कल्याणच्या बिर्ला स्कूलच्या १८ विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक दरवर्षीप्रमाणे यंदा बाली इथे सहलीसाठी गेले होते. ९ मे रोजी बाली येथे रिव्हर राफ्टिंग करताना श्वेता यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.श्वेता यांचा मृतदेह बालीमधील गैण्यार शहरातील पायांगण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयास ट्वीट करत पाठक यांच्या नातेवाइकांना मदत करावी, असे आवाहन केले आहे.

बिर्ला शाळेने निवेदन जारी करताना श्वेता पाठक यांचा उल्लेख “शिक्षिकेपेक्षाही अधिक” असल्याचे वर्णन केले. शाळा प्रशासनाने “पाठक कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे” आवाहन केले आहे.ट्रॅव्हल ऑपरेटर अस्मित कंधारे म्हणाले की “ही एक दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना आपल्याला आठवण करून देतात, की सुरक्षित वाटणारे साहसी स्पोर्ट्स देखील क्षणार्धात दुःखदायक घटनेत परावर्तित होऊ शकतात” ते पुढे म्हणाले की, पर्यटक सुट्टीच्या काळात अनेकदा जोखिमांकडे दुर्लक्ष करतात, विशेषतः अशा लोकप्रिय ठिकाणी जिथे साहसी खेळांना नियमितपणे राबवले जाते.

पर्यटन विषयातील जाणकार असलेले परेश कदम म्हणाले, “आम्हाला हा प्रकार वारंवार दिसतो – स्थानिक परिस्थिती किंवा सुरक्षितता मानकं न समजून घेता केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पर्यटक अतिउत्साहाच्या भरात सहभागी होतात.”साहसी उपक्रमात सहभागी होण्यापूर्वी पर्यटकांनी मार्गदर्शकांची पात्रता, उपकरणांची स्थिती आणि आपत्कालीन प्रक्रियांची उपलब्धता याबद्दल विचारावे असे परेश कदम यांनी सुचवले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.