कार्यक्रमावरुन परतताना ट्रेलरची धडक, सहा महिन्यांच्या बाळासह 13 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी.

रायपूरमध्ये दोन वाहनांच्या भीषण अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.एका भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे हा दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, एका माझदा गाडीला ट्रेलरने धडक दिल्याने हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर सर्वत्र विखुरलेले मृतदेह दिसत होते. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलं गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात खरोरा येथील बांगोली येथे झाला.

चातोदला जात असताना, माझदा गाडी रायपूरहून येणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडकली. या मध्ये एका वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळासह सुमारे ५० लोक जखमी झाल्याची माहिती आहे.पुनीत साहू यांचे नातेवाईक स्वराज माझदा गाडी क्रमांक CG 04 MQ 1259 मधून प्रवास करत असताना ही दुःखद घटना घडली. ते चौथिया छट्टी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कार्यक्रमावरुन परतत असताना रायपूर-बालोदाबाजार रोडवरील सारागावजवळ त्यांची गाडी एका ट्रेलरला धडकली. या अपघातात ९ महिला, २ मुली, १ मुलगा आणि ६ महिन्यांच्या मुलीसह १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना तात्काळ खारोरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्र आणि रायपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी रायपूर येथे पाठवण्यात आले. चौथिया छठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावातील लोक माझदा वाहनाने खरोरा येथील बना बनारसी येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण परतत होते. दरम्यान, रायपूर-बालोदाबाजार रोडवरील सारागावजवळ एका ट्रेलर वाहनाची धडक झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड आणि आक्रोश झाला. प्रशासनाच्या पथकाने क्रेनच्या मदतीने गाडीतील मृतदेह बाहेर काढले आहेत. सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.