मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण कामात भ्रष्टाचार? भाजपच्या माजी नगरसेवकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

महापालिकेच्या ए वॉर्डमधील कामात अनियमितता असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.मुंबई महापालिकेकडून मुंबईत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. मात्र हे काँक्रीट रस्ते विविध कारणांनी चर्चेत आहेत. या सिमेंट काँक्रीट कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. महापालिकेच्या ए वॉर्डमधील (नरिमन पॉईंट, कुलाबा आदी परिसर) कामात अनियमितता असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.ए वॉर्डमध्ये (वर्क कोड सी ३२० अंतर्गंत) सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. यामध्ये २२ रस्त्यांचा समावेश असून त्यासाठी १६४ कोटी रुपये खर्च होणार आहे.

काही कंत्राटदार आणि मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असून यामुळे बिलामध्ये वाढ झाल्याचे सांगत सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप नार्वेकर यांनी पत्रातून केला आहे. वर्क कोड सी-३२० हे काँक्रीट रस्ते कामातील एक उदाहरण असून यामध्ये साहित्याच्या प्रमाणात जाणूनबुजून वाढ करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.धातू, रेती, स्टील आणि सिमेंट यांसारख्या बांधकाम साहित्याची प्रत्यक्ष खरेदी सुमारे ५० टन होती, परंतु कंत्राटदारांनी महापालिकेला १०० टनाचे बिल दिले आहे. यामुळे रक्कम दुप्पट होऊन सरकारी तिजोरीवर अनावश्यक भार पडला आहे. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

साहित्य खरेदी आणि महापालिकेला पाठवलेले बिल यांचा समावेश असलेल्या कंत्राटदारांच्या हिशेब पुस्तकांचे सखोल परीक्षण करण्यात यावे. शिवाय, काँक्रीट रस्त्यांच्या कामांवर एक सर्वसमावेशक श्वेतपत्रिका काढून ती सार्वजनिक करावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.एच पश्चिम या खार, वांद्रे पश्चिम वॉर्डातील एका रस्तेकामात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीट मिश्रणात दर्जाचा अभाव आढळून आल्यावर संबंधित दुय्यम अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये आणि दर्जा नियंत्रण संस्थेस २५ लाख रुपयांचा दंड महापालिकेने ठोठावला आहे.मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे. मुंबईत पश्चिम उपनगरात टप्पा एक व टप्पा – दोन असे मिळून १ हजार १७३ रस्त्यांचे (एकूण लांबी ४३३ किमी) – काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यापैकी टप्पा १मधील २६० आणि टप्पा २मधील ४९६ रस्त्यांची कामे – प्रगतीपथावर आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.