हळदीच्या कार्यक्रमातून घरी जाताना बाईक दुभाजकाला धडकली अन्… दोन कुटुंबांनी आधार गमावला.

पालघरमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. एका कार्यक्रमातून घरी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पालघरच्या सकवार परिसरात हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. एकाचा हळद समारंभ आटोपून हे दोघे घरी परतत होते. तेव्हा वाटेतच त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि ते घरी पोहोचू शकले नाही. अशोक दत्तू खांडवा (वय 25) आणि पारस सुनील वरठा (वय 18) अशी या अपघातातील मृत दोन्ही तरुणांची नावं असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी शेजारी असलेल्या दोन कुटुंबाने आपली मुलं गमावल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हालोली- बोट परिसरात एका लग्न समारंभात अशोक हांडवा आणि पारस वरठा हे दोघे तरुण आणि त्यांच्यासोबत आणखी काहीजण सहभागी होण्यासाठी गेले होते. हे सर्व दुचाकीने कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. लग्न- हळद समारंभ आटोपून ते पुन्हा दुचाकीवरून आपल्या घराच्या दिशेने निघाले.वाटेत मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार नजीक एका काँक्रीटच्या दुभाजकाला त्यांची दुचाकी धडकली आणि भीषण अपघात घडला. शनिवारी (10 मे) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात दोन्ही तरुण गंभीररित्या जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अपघातात मृत झालेले अशोक हांडवा आणि पारस वरठा हे दोघेही राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खानिवडे येथील हनुमाननगर परिसरातील रहिवासी आहेत. दोघेही एकमेकांच्या शेजारीच राहत होते. दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.