लाखात एक आमचा फौजी! बहिणीच्या लग्नापूर्वी कॉल, जवान क्षणात देशसेवेला रवाना, मायबाप म्हणतात आमचा लेक…

 बहिणीच्या लग्नासाठी शुभम तीन महिन्यांची रजा घेऊन गावी आले होते. बहिणीच्या लग्नासाठी स्थळ बघण्याचे काम सुरू होते.बहिणीच्या लग्नासाठी तीन महिन्यांची रजा घेऊन जवान गावी आला होता. मात्र भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सैन्यातून कॉल आला, त्यामुळे बहिणीच्या लग्नाचे कार्यक्रम अर्ध्यावर सोडून, क्षणाचाही विलंब न करता जवान देशसेवेसाठी रवाना झाला. छत्रपती संभाजीनगर येथील जबरी गंगापूर तालुक्यातील देवळी गावात या प्रसंगाने भावनिक वातावरण निर्माण झाले होते. ‘आधी लगीन कोंढाण्याचंं, मग रायबाचं’ ही शिवकाळापासून चालत आलेली आपली संस्कृती आजही जवान पाळतानाशुभम भाऊसाहेब पाटील चिंधे असे जवानाचे नाव आहे. शुभम चिंधे हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील देवळी या गावचे रहिवासी आहेत. शुभमला लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची इच्छा होती.

अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर शुभम याने आपले स्वप्न साकार केले आणि तो देशसेवेत रुजू झाला.दरम्यान बहिणीच्या लग्नासाठी शुभम तीन महिन्यांची रजा घेऊन गावी आले होते. बहिणीच्या लग्नासाठी स्थळ बघण्याचे काम सुरू होते. याच काळात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरात सिंदूर ऑपरेशन राबवले. यामध्ये दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले.भारत पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे केंद्र सरकारने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या. सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने सेवेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले.

केंद्र सरकारचे आदेश येतात क्षणाचाही विलंब न करता शुभम चिंधे हे बहिणीचं लग्न अर्ध्यावर सोडून देशसेवेसाठी रवाना झाले. यावेळी गावामध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते.जवान शुभम यांच्या आई संगीता या बाजार समितीच्या संचालिका आहे. त्या म्हणाल्या आमचा मुलगा देशसेवेसाठी सीमेवर गेला. आमचा मुलगा देशसेवा करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर वडील भाऊसाहेब चिंधे हे म्हणाले आमच्या मुलाला लहानपणापासून देशसेवेची आवड होती. आज देशावर असलेल्या संकटाच्या काळात मुलगा संरक्षणासाठी गेला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.