साताऱ्यात चहा घेतला अन् काही मिनिटातच होत्याचं नव्हतं! देवदर्शनाला जाण्याआधी बिरोबा मंदिरासमोर काळाचा घाला.

इचलकरंजी येथील ही खासगी प्रवासी बस ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशनमार्गे सालपे घाट उतरून लोणंदकडे शनिवारी मध्यरात्री जात होती.महिलांना घेऊन देवदर्शनासाठी उज्जैनला निघालेली खासगी प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जण मृत्युमुखी पडले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला.अपघातात बसचा चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय २४, रा. मालबाग पाटील गल्ली, शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), रजनी संजय दुर्गुळे (४८, रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तेरा जखमींना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सर्व जखमी इचलकरंजी, वडगाव व कोडोली येथील आहेत.इचलकरंजी येथील ही खासगी प्रवासी बस ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशनमार्गे सालपे घाट उतरून लोणंदकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. ती बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंदकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक समोरून आला असता दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली.शशिकला ध्रुवकुमार बोनगे (वय ६६), दीपाली नागेश बोनगे (वय ४२), ईश्वरी नागेश बोनगे (वय २२), शारदा महेश बोनगे (वय ४१), शीला राहुल बोनगे (वय ३७), इच्छा राहुल बोनगे (वय १५),

प्रथमेश महेश बोनगे (वय ७), ध्रुवकुमार पांडुरंग बोनगे (वय ७०), मंगल वसंत सुतार (वय ६४), चंद्रकांत अतिगीडद (वय ४८, सर्व रा. गोकुळ चौक, इचलकरंजी), वासंती विलास सवाईराम (वय ६९, रा. पुणे), वैशाली अनिल दुर्गुळे (वय ४९), ज्योती दीपक मुदगल (वय ५०, रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.रात्रीचा प्रवास असल्याने बस चालक सलमानसह काही प्रवाशांनी साताऱ्यात हायवेवर मध्यरात्री सव्वा वाजताच्या सुमारास चहा घेतला. त्यानंतर जेमतेम काही मिनिटातच या बसला अपघात झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.