भाच्याला भेटायला जाताना टँकरने चिरडलं, पुण्यातील प्रसिद्ध तबला वादकाचा दुर्दैवी मृत्यू.

शाळेला सुट्टी असल्याने ते दोन दिवसांपूर्वी सासूरवाडी पिशवी (ता. शाहूवाडी) येथे कुटुंबासह राहायला आले होते. रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कोल्हापूर येथे भाच्याला भेटण्यासाठी दवाखान्यात जात होते. यावेळी भरधाव टँकरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने सुतार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध तबला वादक आणि संगीत शिक्षक विनोद कृष्णा सुतार ( वय 46) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर असणाऱ्या कातोली फाट्याजवळील लक्ष्मी पॅलेस हॉलसमोर रविवारी ( दि. 11) दुपारी पाण्याच्या टँकरने दुचाकीला मागून दिल्याने हा अपघात झाला. या प्रकारणी टँकरचालक मुश्ताक अन्सारी (रा. केर्ली) याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद सुतार हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीत संगीत शिक्षक होते. त्यांचे मूळगाव शाहूवाडी तालुक्यातील गोगवे आहे. शाळेला सुट्टी असल्याने ते दोन दिवसांपूर्वी सासूरवाडी पिशवी (ता. शाहूवाडी) येथे कुटुंबासह राहायला आले होते. रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कोल्हापूर येथे भाच्याला भेटण्यासाठी दवाखान्यात जात होते.

यावेळी भरधाव टँकरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने सुतार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी बाजूला फेकली गेली, तर सुतार टँकरच्या पुढील चाकाखाली सापडले. चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच हायवे सुरक्षा पोलिस उपनिरीक्षक सुभाष मोरे आणि करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुतार यांना १०८ रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. माजी उपसरपंच पंडित नलवडे आणि पोलिसपाटील सचिन भोपळे यांनी पोलिसांना माहिती दिली. सुतार यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पालघरच्या सकवार परिसरात हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. एकाचा हळद समारंभ आटोपून हे दोघे घरी परतत होते. तेव्हा वाटेतच त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि ते घरी पोहोचू शकले नाही. अशोक दत्तू खांडवा (वय 25) आणि पारस सुनील वरठा (वय 18) अशी या अपघातातील मृत दोन्ही तरुणांची नावं असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी शेजारी असलेल्या दोन कुटुंबाने आपली मुलं गमावल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.