साळाव ते ताडगाव, दाम्पत्य प्रत्येक विहिरीत वीट टाकत गेले, गावकऱ्यांना विषाचा संशय, हटकताच भयंकर उलगडा, अलिबाग हादरलं.

रायगड जिल्ह्यातील साळाव रोहा मार्गावर ताडगाव येथे एका विहिरीत विष टाकल्याच्या संशयावरून रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अखलाक खान आणि रेश्मा खान या दांपत्यावर हा आरोप आहे. त्यांच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याने त्यांनी एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून विहिरीत विटा टाकल्या, असा आरोप आहे. ग्रामस्थांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.साळाव रोहा रस्त्यावरील ताडगाव येथील विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय निर्माण झाल्याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात अखलाक अयुब खान(वय 47 वर्षे), व त्यांची पत्नी रेश्मा अखलाक खान(वय 47 वर्षे) दोन्ही सध्या रा. परशुराम बिल्डिंग, रूम नं.301, सेक्टर 23, नेरुळ सी वूड्स दारवे, नवी मुंबई, मुळ रा. केळशी, दाभोळ जि. रत्नागिरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रेवदंडा पोलिस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे.अखलाक अयुब खान आणि रेश्मा अखलाक खान यांची मुलगी सादिया अखलाक खान (वय 23 वर्षे) हिचे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तुर्भे येथील एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. मुलाशी लग्न करुन देण्यास सदर इसम आणि त्याची पत्नी यांचा विरोध आहे पण त्यांची मुलगी त्याच मुलाशी लग्न करण्यासाठी तगादा लावत आहे.

आई वडील हे आपल्याला पसंत असलेल्या मुलाबरोबर लग्न लावून देत नसल्याने सादिया अखलाक खान हिने यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अखलाक खान याने कल्याण येथील मांत्रिकाकडे धाव घेतली.अखलाक खान याने कल्याण येथे असणारा कोणीतरी मांत्रिककडे याबाबत उपाय काय करावा जेणेकरून त्याची सादिया ही त्याचे प्रेम संबंध असणाऱ्या मुलासोबत संबंध तोडून टाकेल म्हणून सदर मांत्रिक याने अखलाक खान याला 21 विटा घेऊन त्यावर अल्ल्हाचे नाम लिहून मंत्रतंत्र करुन देऊन ते 21 विहिरीत टाकण्याबाबत सांगितले त्यावरून अखलाक खान याने काही विटा नेरुळ नवी मुंबई येथे विहिरीत टाकल्या होत्या मात्र अखलाक अयुब

कोर्लई सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांच्या सहित मुरुड तालुक्यातील ताडगाव व परिसरात असलेल्या गावातील शेकडो ग्रामस्थ यांनी रेवदंडा पोलिस ठाण्याबाहेर एकत्र जमून त्यांनी अखलाक खान याने सार्वजनिक पाण्याचे विहिरीत विष टाकले आहे किंवा कसे या शंकेचे निरसन करून देणेबाबत व गुन्हा दाखल करणेबाबत मागणी लावून धरली होती आणि तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली.तेव्हा ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर करण्याकरिता रेवदंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत किरवले यांनी सदर विहिरींतील पाणी ग्रामस्थांना पिऊन दाखवले तसेच अखलाक खान याने देखील सदर पाणी पिऊन दाखवले. तसेच मुलीचे असलेले प्रेम संबंध तुटावे यासाठी मांत्रिकाचा आधार घेत अंधश्रद्धा याला खत पाणी घातल्या विरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी रेवदंडा पोलिस स्टेशन आवारात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा होऊन संतप्त झाले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग मुख्यालय मुरुड येथून अधिक पोलिस कर्मचारी यांची कुमक मागविण्यात आली होती. यावेळी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी जमलेल्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन देत शांत केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.