ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत ‘इतिहास’ गवसला, शिवकालीन ठेव्याशी साधर्म्य.

 ऐतिहासिकदृष्ट्या मराठा धोप या पद्धतीच्या तलवारी खूप दुर्मिळ व अमूल्य आहेत. इंडियन आर्म्स अॅक्टनंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून नष्ट केली. त्यातून वाचलेली शस्त्रे अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे.ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून विहिरीत लपविलेली ऐतिहासिक व पुरातन शस्त्रे महाबळेश्वर येथील एका कोरड्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्याची पाहणी करून ती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पुरातत्व खात्याच्या ताब्यात देण्यात आली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचा अभ्यास करताना इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे (फलटण) व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना दि. 3 मे 2025 रोजी एका जुन्या विहिरीमध्ये (आड/ बावडी) “मराठा धोप” प्रकारच्या तलवारीची मूठ व इतर पुरातन वस्तू निदर्शनास आल्या.ऐतिहासिकदृष्ट्या मराठा धोप या पद्धतीच्या तलवारी खूप दुर्मिळ व अमूल्य आहेत. इंडियन आर्म्स अॅक्टनंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून नष्ट केली. त्यातून वाचलेली शस्त्रे अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगप्रसिद्ध जगदंबा व भवानी तलवारी या प्रकारच्या आहेत. मराठा युद्धनीती व शस्त्रांचा अभ्यास करून धोप या तलवारी बनवल्या.

या तलवारींसाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशातील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे यांना फिरंगी देखील म्हणत असत. हे पोलाद उत्कृष्ट दर्जाचे असत. या तलवारींचे दोन, उपप्रकार आहेत. पहिला प्रकार वक्र धोप याचे पाते टोकाचा पिपळा भाग थोडा वक्र असतो.दुसरा सरळ धोप- याचे पाते सरळ असते. अशा तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत, याची लांबी 4 फूट असत. शत्रूला भोकसण्यासाठी हे शस्त्र वापरले जात. या फिरंगी पात्यांना मराठ्यांनी युद्धामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी व हाताला इजा न करणारी मूठ बनवली व याचा समतोल बॅलन्स उत्तम केला, अशी माहिती अभ्यासक मयुरेश मोरे यांनी दिली. ही ऐतिहासिक ठेव दुर्मिळ आहे हे लक्षात येताच राहुल कदम यांनी वेळ न दवडता ही माहिती गावातील काही प्रमुख व्यक्तींना दिली.

धनेश नाना वाडेकर यांनी यांची कल्पना उपविभागीय अधिकारी वाई राजेंद्र कचरे यांना दिली.तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, त्याच्यासोबत महारूद्र तिकुंडे (अध्यक्ष युवाराज्य फाउंडेशन सातारा), सुभाष गायकवाड, रोहन ढाणे यांची टीम साताराहून श्री क्षेत्र महाबळेश्वरला येऊन महाबळेश्वर ट्रेकर्सच्या साह्याने ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि अनिल लांगी यांनी या ऐतिहासिक वस्तू विहिरीतूनवर काढल्या.यावेळी धनेश वाडेकर, प्रशांत कात्रट, निलेश धनावडे, आनंद ढेबे, महेश लांगी, संकेत लांगी हे स्थानिक उपस्थिती होते. अशा ऐतिहासिक वस्तूंच्या माध्यमातून इतिहासाची अनेक दडलेली पाने उघडले जाऊ शकतात, असे मार्गदर्शन अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.