मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

पुण्यात एका इस्टेट एजंटची हत्या करण्यात आली आहे. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या एका स्टेट एजंटचा दोन नराधमांनी खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (9 मे) रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे घडली आहे. मृत व्यक्ती हा घरी जात असताना आरोपींनी त्याला गाठून त्याचा खून केला आहे. खून करणारे आरोपी हे काका पुतण्या असल्याची माहिती आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ येथे गुन्हा नोंद केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मृत इस्टेट एजंटचे नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असल्याची माहिती आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघेही रा. खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेव्हणीचे आरोपी रोहित बरोबर अनैतिक संबंध होते. रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचा, नंतर त्याने टुरिस्टचा व्यवसाय सुरु केला होता. मनोहर यांचा दोघांच्याही अनैतिक संबंधांना विरोध होता. यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री रोहितने त्याच्या दोन तीन मित्रांना घेऊन मनोहरला पुण्याच्या पवारनगर येथे गाठले.तेथे ज्ञानदा अपार्टमेंटच्या समोर आधी त्यांना लाथा-बुक्क्यांनी आणि बांबूने मारहाण करण्यात आली. बांबूचा वार डोक्यावर वर्मी लागल्याने मनोहरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींच्या मागावर दोन पथके रवाना केली. यातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बीडे येथील गेवराई येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.