भारत पाक दरम्यान युद्धजन्य परिस्थीती निर्माण झाली असून आरोपी मोसिन मुजावरने त्याच्या इंन्स्टाग्राम आयडीवरून इतरांना देखील सदर मेसेज प्रसारित करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पेणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा जोरदार निषेध केला आहे.रायगड जिल्ह्यातील पेण येथील मोसीन मुजावर या तरुणाने देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट केली असून त्याच्यावर ९ मे २०२५ रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद आयुष किरण शहा, पेण यांनी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष साईराज कदम यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर फिर्याद दिली असल्याची माहिती पेण पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. मोसीन मुजावर याने केलेल्या देश विरोधी वक्तव्याविरोधात त्याच्याविरोधात पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.










