चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोठी दुर्घटना घडली. पहिल्या घटनेत, नागभीड तालुक्यात दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत रमेश दडमल आणि राकेश बदन या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे, सिंदेवाहीजवळ तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर वाघाने हल्ला केल्याने कांता चौधरी, शुभांगी चौधरी आणि रेखा शेंडे यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.गावातील दोघे जण विरुद्ध दिशेने निघालेत. गावापासून ७० किमी अंतरावर दोघांचा दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दोघेही गंभीररित्या जखमी झालेत. उपचारासाठी दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.रमेश शामराव दडमल (३६), राकेश रामप्रसाद बदन (३०) अशी मृतकांची नावे आहेत.










