पुण्यातल्या घटनेचा उलगडा, तीन अल्पवयीन मुलांनीच ३७ वर्षीय इसमाचा जीव घेतला, तपासात धक्कादायक कारण समोर.

सिगारेट आणि माचिस न दिल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकारणी चिखली पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.पिंपरी चिंचवड भागातील चिखली परिसरात एका 37वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. त्याचा उलगडा अवघ्या काही तासांत पोलिसांनी केला आहे. सिगारेट आणि माचिस न दिल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकारणी चिखली पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. महेश शिवाजी चामे (वय ३७, रा. नवचैतन्य हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चिखली भागात महेश चामे हे रस्त्याच्या कडेला मोबाईल स्क्रीन गार्ड लावण्याचा व्यवसाय करतात. ते मूळ लातूर येथील असून सध्या चिखली मधील नवचैतन्य सोसायटीमध्ये राहत होते.

शारदानगर भागात 8 मे रोजी सकाळी 9 च्या सुमारास महेश याचा मृतदेह सापडला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरु होता. मात्र अवघ्या काही तासांत पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे.व्यसनाच्या आहारी गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांनी महेश यांच्याकडे सिगारेट आणि माचिस मागितली होती. मात्र ती दिली नाही म्हणून त्यांनी महेश याचा कोयत्याने वार करून खून केला. अशी माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपींचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी हे मोरेवस्ती, मोरया कॉलनी येथील न्यू गोल्डन बेकरीच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये बसले आहेत.

त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेत आरोपीनी वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.दुसरीकडे, मुंबईतील गोरेगाव येथील 63 वर्षीय महिलेचा मृतदेह राहत्या घरातील लोखंडी पलंगाच्या आत आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. महिलेचा 65 वर्षीय जोडीदार प्रदीप बास्कोटी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय वाढला आहे. गुरुवारी शवविच्छेदन अहवालात रागिणी सावरडेकर यांचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले. पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.