परवानगीशिवाय ड्रोन उडवू नका, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सूचना; विमानतळ परिसरात लेझर, बीम लाइटवरही बंदी.

पुण्यात ड्रोन उडवण्यावर पोलिसांची सक्ती असून परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास कारवाई होणार आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे सुरक्षा वाढवली असल्याने विवाह किंवा चित्रिकरणासाठी ड्रोन वापरायचा असल्यास परवानगी आवश्यक आहे.नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.‘सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात पोलिस परवानगीशिवाय एकही ड्रोन उडणार नाही,’ याची खबरदारी घेण्याची सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही सूचना केली आहे. विना परवानगी ड्रोन उडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून भारतीय सीमेत घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कोणत्याही प्रकारचा ड्रोन परवानगीशिवाय उडवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘कोणताही वैवाहिक समारंभ, चित्रिकरण, जाहिरात, रस्ता सर्व्हे किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी ड्रोनचा वापर करायचा असल्यास, संबंधितांनी स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधून अधिकृत परवानगी घ्यावी. परवानगी न घेता ड्रोन उडवणे कायदेशीर गुन्हा मानला जाईल,’ असे नमूद करून पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.देशाच्या सुरक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पाकिस्तानाने सीमावर्ती भागात क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर रात्रीपासून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, विविध लष्करी संस्था, संशोधन संस्थांच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.‘समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या मेसेजची खातरजमा करणे गरजेचे आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना माहिती द्यावी. समाजमाध्यमातील संदेशांवर बारकाईने नजर ठेवावी,’ असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे. सायबर सुरक्षा विचारात घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या संशयास्पद गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. शक्यतो अशा फाइल उघडू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.लोहगाव येथे हवाई दलाचा तळ आहे; तसेच नागरी विमानतळ आहे. विमानतळापासून १५ किलोमीटर अंतराच्या परिघात बीम लाइट, लेझर, बीम लाइट सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती विचारात घेऊन सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.शहरात विविध कारणास्तव ६६ ड्रोन उडवताना संबंधितांना पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. परवानगी घेऊनच ड्रोनचा वापर करता येणार आहे. काही संवेदनशील भागात ड्रोन उडवण्याला आधीपासूनच बंदी आहे, अशी माहिती पुणे शहर, पोलिस आयुक्त, अमितेशकुमार यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.