गेम फिरला! तक्रारदाराने आळस देऊन इशारा केला अन् शिंदेंचा शिलेदार लाच घेताना पकडला गेला.

 दीपक पवार याने तक्रारदाराला सांगितले की पेट्रोल डिझेलची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यासाठी आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक व फिरत्या पथकाला पैसे द्यावे लागेल. तुम्ही त्यांना पैसे दिले तर टेन्शन घेऊ नका, तुमच्यावर कारवाई होणार नाही असे सांगितले.अवजड वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच घेताना एका खाजगी एजंटला अटक करण्यात आली आहे. हि लाच आरटीओचे वाहन निरीक्षक यांच्यासाठी घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाच्या तक्रावरून ही कारवाई करण्यात आली. यात अटक करण्यात आलेला आरोपी शिंदेंच्या शिवसेनेचा उपशहर प्रमुख आहे.दीपक साहेबराव पवार (वय 45, राहणार गारखेडा परिसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात तक्रार देणाऱ्या तक्रारदाराची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून दहा ट्रक ट्रेलर द्वारे डिझेल इंजिनची वाहतूक छत्रपती संभाजीनगर वरून चेन्नईकडे केले जाते.

दरम्यान आरोपी दीपक पवार याला ही माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर दीपक पवार याने तक्रारदाराला सांगितले की पेट्रोल डिझेलची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यासाठी आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक व फिरत्या पथकाला पैसे द्यावे लागेल. तुम्ही त्यांना पैसे दिले तर टेन्शन घेऊ नका, तुमच्यावर कारवाई होणार नाही असे सांगितले. तुमचे दहा ट्रक चालतात प्रत्येक वाहनासाठी पाच हजार रुपये प्रमाणे 50 हजार रुपये द्यावे लागतील असे त्याने सांगितले.दरम्यान तक्रारदाराने या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. उपनिरीक्षक दीपक साबळे, निरीक्षक वाल्मीक कोरे यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरटीओ कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये सापळा रचला.

दीपक पवार यांनी तक्रारदाराला संपर्क करून हॉटेलमध्ये बोलावले. आरोपीने तक्रारदाराकडून 50 हजार रुपये रोख स्वीकारले. यावेळी तक्रारदाराने आळस दिल्याचा इशारा समजतात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दीपक पवार यांच्या मुसक्याआवळल्या.आरोपी दीपक पवार याला पैसे स्वीकारताना अटक केली असून त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अधिकाऱ्याचे नाव नसून फक्त पदाचा उल्लेख आहे. पवार कुणासाठी पैसे घेत होता? त्या अधिकाऱ्याचं नाव निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं अँटीकरप्शन ब्युरोचे अधीक्षक संदीप आटोळ म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.