माझ्या नावापुढे शिक्का मारु नका, श्री छत्रपती कारखाना निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, काळेंची पॅनलमधून माघार.

अजित पवार, भरणेमामा आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कारखान्याला आवश्यकता आहे, म्हणूनच आपण माघार घेत हा निर्णय घेतला. मी आता आजपासूनच या पॅनेलचा प्रचार करणार आहे असे तुकाराम काळे यांनी सांगितले.छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक मध्यावर असतानाच भाजपच्या नेतृत्वाखालील ‘छत्रपती बचाव’ पॅनलला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. इंदापूरचे पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे यांनी पॅनलमधून माघार घेत थेट ‘जय भवानी माता’ पॅनलला पाठिंबा दिला आहे. “आपण जय भवानी माता पॅनलचा प्रचार करणार असून माझ्या नावापुढे शिक्क्यावर मतदान करू नये” असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज सकाळी बारामतीतील नटराज नाट्य कला मंदिरात येऊन तुकाराम काळे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी पॅनलचे प्रमुख व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पॅनलचे समन्वयक किरण गुजर यांच्यासह सनसरचे माजी सरपंच राहुल काळे, अशोक काळे, विक्रांत सरक, वकील प्रदीप थोरात, विलास खटके यांच्यासह इतर उपस्थित होते.यावेळी जाचक यांनी तुकाराम काळे यांच्या पाठिंब्यामुळे आमचा पॅनल आणखी भक्कम झाला असून, आमचे आठ उमेदवार निवडून आलेच आहेत, इतरही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा आपल्याला विश्वास असल्याचे मत पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केले.तुकाराम काळे यांनी बोलताना मी दादांचा माणूस आहे, छत्रपती कारखाना अत्यंत अडचणीतून जात आहे.

अशा वेळी आपण वेगळे काही करायला नको, त्यामुळे अजित पवार, भरणेमामा आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कारखान्याला आवश्यकता आहे, म्हणूनच आपण माघार घेत हा निर्णय घेतला. मी आता आजपासूनच या पॅनेलचा प्रचार करणार आहे असे त्यांनी सांगितले.छत्रपती कारखान्याची निवडणूक तशी काहीशी एकतर्फी झाली असून, छत्रपती बचाव पॅनलला पूर्ण ठिकाणी उमेदवारही मिळालेले नाहीत. तर आता हळूहळू एक एक उमेदवार या पॅनलची साथ सोडत आहेत.दरम्यान, छत्रपती सहकारी कारखान्याच्या 21 जागांसाठी तब्बल 600 हून अधिक जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतीला चारशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.