पुण्यात थरारक अपघात; ट्रिपसी चाललेले, ओव्हरटेक करायला गेले अन् थेट मृत्यूला कवटाळलं.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर-तळेगाव महामार्गावर भीषण अपघात झाला. पीएमपीएल बस आणि दुचाकीच्या धडकेत तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. हे तरुण तळेगाव ढमढेरे येथे जात होते. त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयाजवळ ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर-तळेगाव महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघात झाला आहे. पीएमपीएल बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रथमेश नंदकुमार शेलार (वय १८), हर्षल दिगंबर घुमे (वय १९) आणि आयुष अतुल जाधव (वय १६) यांचा समावेश आहे. यापैकी दोन तरुण तळेगाव ढमढेरे येथील, तर एक मावळ येथील रहिवासी होता.

या घटनेने शोककळा पसरली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे मित्र शुक्रवारी रात्री एकाच दुचाकीवरून तळेगाव ढमढेरे येथे जात होते. त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोर त्यांनी समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून येणाऱ्या पीएमपीएल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत.या अपघातामुळे तळेगाव ढमढेरे आणि परिसरात शोककळा पसरली आहे. तीन तरुणांच्या अकाली मृत्यूने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

स्थानिकांनी रस्त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले असून, अशा घटनांच्या पुनरावृत्तीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला असून, बसचालकावर कारवाई होण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेने तिघांच्या कुटुंबंवर शोककळा पसरली आहे.दरम्यान, महाराष्ट्रामध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. २०२० पासून आतापर्यंत राज्यात १ लाख ५९ हजार रस्ते अपघात झाले आहेत, ज्यात सुमारे ७१ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. २०२० मध्ये २४ हजार ९७१ अपघातांमध्ये ११ हजार ५६९ मृत्यू झाले होते, तर २०२४ मध्ये ३६ हजार ८४ अपघातांमध्ये १५ हजार ३३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.