घरी पत्नी वाटेला डोळे लावून बसली, नवऱ्यावर काळाची झडप, सुसाट निघालेल्या कारचा भीषण अपघात अन् बाप लेक जागीच ठार.

स्विफ्ट कार वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यानंतर दोन ते तीन वेळा पलटी होऊन ट्रॅव्हल्स वाहनावर आदळली. धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला.पाटोदा जवळ असलेल्या बामदळ वाडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पुण्याहून केजकडे जाणाऱ्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारने महामार्गावरील पुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कार दोन ते तीन पलट्या खात ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. या दुर्दैवी अपघातात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला.अशफाक शेख (वय ४२) व त्यांचा मुलगा अलमस अल्ताफ शेख (वय १५, दोघे रा. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. ते केज येथे काही कामानिमित्त प्रवास करत होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास पाटोदा शहराजवळील बामदळ वाडा परिसरात हा अपघात घडला. स्विफ्ट कार वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली.

त्यानंतर दोन ते तीन वेळा पलटी होऊन ट्रॅव्हल्स वाहनावर आदळली. धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भडके व बीट अंमलदार सचिन तांदळे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. व मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर-तळेगाव महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. पीएमपीएल बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रथमेश नंदकुमार शेलार (वय १८), हर्षल दिगंबर घुमे (वय १९) आणि आयुष अतुल जाधव (वय १६) यांचा समावेश आहे. यापैकी दोन तरुण तळेगाव ढमढेरे येथील, तर एक मावळ येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे मित्र शुक्रवारी रात्री एकाच दुचाकीवरून तळेगाव ढमढेरे येथे जात होते. त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोर त्यांनी समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून येणाऱ्या पीएमपीएल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.