भावाच्या लग्नासाठी सुट्टीवर, कॉल आला अन् CRPF जवान भारतमातेच्या सेवेस रवाना, देशभक्तिपर गाणी लावत गावाकडून मिरवणूक.

भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नंदुरबार येथील सुपुत्र असलेले केंद्रीय सुरक्षाच्या दलातील जवान किशोर भगवान माळी यांनाही तात्काळ सैन्य दलाने बोलविले. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने भावाच्या लग्नासाठी सुट्टी काढली. तो गावाकडे आलाही, मात्र अचानक सुट्टी रद्द झाल्याचा फोन आला. त्यामुळे लग्न सोडून भारतमातेच्या रक्षणासाठी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी तो रवाना झाला. लग्नाला चार दिवस बाकी असताना सुट्टीवर आलेला जवान माघारी परतला. जेमतेम 24 तासही तो गावात थांबला नाही. भावाच्या लग्नापेक्षा देशसेवेला प्राधान्य देणाऱ्या जवानाला डीजेच्या तालावर देशभक्तिपर गाणी लावून मिरवणूक काढून शुभेच्छा देण्यात आल्या. माळीवाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून त्याला रवाना केले.नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात राहणारे किशोर भगवान माळी केंद्रीय सुरक्षा दलात कार्यरत आहेत.

त्यांच्या काकांचा मुलगा प्रकाश श्रावण माळी याचे 14 तारखेला लग्न होते. त्यामुळे किशोर माळी हा जवान लग्नासाठी सुट्टी घेऊन आठ मे रोजी रात्री उशिराने नंदुरबार येथे दाखल झाला.भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नंदुरबार येथील सुपुत्र असलेले केंद्रीय सुरक्षाच्या दलातील जवान किशोर भगवान माळी यांनाही तात्काळ सैन्य दलाने बोलविले. भावाच्या लग्नाअगोदरच सैन्य दलाने बोलविताच त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत जवान किशोर माळी हे देश सेवेसाठी तात्काळ सीमेवर नऊ मे रोजी रात्री लगेच रवाना झाले. घरात लग्नाचे वातावरण सुरू असताना, लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना जवान सीमेवर भारत मातृभूमीच्या रक्षणासाठी निघाला.

भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. भारतातर्फे ऑपरेशन सिंदूर राबविण्यात येत आहे. मात्र पाकतर्फे वेगवेगळ्या कुरापती सुरू आहेत. भारतीय सेना पाकला सडेतोड उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार येथील सुपुत्र जवान किशोर माळी हे भावाच्या लग्नासाठी आले असताना त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ते गावाकडे आल्यानंतर काही तासातच युद्धासाठी रवाना झाले. ते नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात राहतात. तेथील नागरिकांनी डीजेवर देशभक्तीपर गीते लावत मोठ्या संख्येने उपस्थित राहत जवानाला रवाना केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.