वर्षभरापूर्वी पाच हजार भिकारी, आता इंदूर ठरलं देशातील पहिलं भिकारीमुक्त शहर; रोजगार देऊन पुनर्वसन.

 इंदूर शहर देशातील पहिले भिकारीमुक्त शहर बनले आहे. शहरात भीक मागण्यास बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. भीक मागणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास बक्षीस दिलं जात आहे. प्रशासनाने भिकाऱ्यांचे पुनर्वसन केलं असून या मोहिमेची प्रशंसा केली आहे.भीक मागणे तसेच भिकाऱ्यांना पैसे देणे किंवा त्यांच्याकडून काहीही विकत घेणे यावर शहरात बंदी घालण्यात आली असून, आतापर्यंत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. भीक मागणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. आतापर्यंत अनेकांनी हे बक्षीस मिळवल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे.

वर्षभरापूर्वी प्रशासनाने मोहीम हाती घेण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर सुमारे पाच हजार भिकारी होते. जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी याबाबत माहिती दिली.इंदूर शहराला भिकारीमुक्त करण्यासाठी येथे विविध उपक्रम, प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवण्यात आल्या. शहरातील भिकाऱ्यांना रोजगार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले, तर भीक मागणाऱ्या मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. ‘भिकारी निर्मूलनासाठी आम्ही सुरू केलेली मोहीम एक आदर्श पद्धत बनली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या पथकानेही याला मान्यता दिली आहे’, असे सिंह यांनी सांगितले.केंद्रीय मंत्रालयाने भिक्षेकरी निर्मूलनाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केलेल्या १० शहरांपैकी इंदूर एक आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये भीक मागण्याविरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती. शहरात ५०० मुलांसह सुमारे पाच हजार भिकारी होता. पहिल्या टप्प्यात आम्ही जनजागृती मोहीम राबवली. त्यानंतर भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आले. राजस्थानहून इंदूरला भीक मागण्यासाठी येणारे अनेक भिकारीही आम्हाला सापडले,’ असे महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रामनिवास बुधोलिया यांनी सांगितले.दरम्यान, इंदूरमध्ये वर्षभरापूर्वी भिकारी मुक्त अभियान सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी व्हीआयपी भिकारीही पकडण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनंतर, एका भिकाऱ्याला ताब्यात घेतलं असता, त्याच्याजवळ ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. इंदूरमध्ये त्याचं पैसे मागण्याचं ठिकाण ठरलेलं होतं. तो भिकारी दररोज स्लीपर क्लासचं तिकीट काढून आंध्र प्रदेशातील कर्नूल येथून इंदूरला येत होता. त्याच्याकडे रेल्वेचा रिझर्वेशन फॉर्म आणि तिकिटंही पोलिसांना चौकशीत सापडलं होतं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.