पाकिस्तानचे सोशल मीडियावर रडगाणे, भारताविरोधात खोटे दावे, लष्कराकडून पत्रकार परिषदेत पोलखोल.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. सीमावर्ती भागात गोळीबार करत गावं आणि दुकानांचं नुकसान केलं. पाकिस्तानने ड्रोन आणि लढाऊ विमानांचा वापर करत भारतीय सेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने सोशल मीडियावर खोटे दावे पसरवल्याचं कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सतत भारतातील विविध ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने सीमावर्ती भागात केलेल्या गोळीबारात अनेक गावातील घरांचं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. या तणावादरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांबाबत बोलताना कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानने भारताबाबत कशाप्रकारे खोटे दावे सोशल मीडियावर दिले याबाबतही माहिती दिली.पाकिस्तानकडून सतत आक्रमपणे मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत. त्यात यू-कॅप ड्रोनसह लडाखू विमानांचा उपयोग करुन भारतीय सेनेवर निशाणा साधला.

नियंत्रण रेषेवर ड्रोनच्या घुसखोरीसह मोठ्या हत्यारांसह गोळीबार केला. आंतराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर श्रीनगरसह २६ ठिकाणांवर हवाई घुसखोरी द्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सेनेने हे ड्रोन यशस्वीरित्या निष्क्रिय केले. त्याशिवाय वायू सेना स्टेशन्सवर उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूज, भंटिंडा स्टेशन येथील कर्मचारी तसंच उपकरणांना नुकसान केलं.पाकिस्तानने सकाळी १ वाजून ४० मिनिटांनी हाय स्पीड मिसाईल पंजाबच्या एअरबेस स्टेशनवर डागण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने श्रीनगर, उधमपूर, अवंतीपूरच्या वायूसेना ठिकाणांवर आणि शाळा परिसरावर निशाणा साधला, त्यातून नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करुन पाकिस्तानची पुन्हा एकदा बेजबाबदार वृत्ती समोर आली आहे.

पाकिस्तानने चुकीच्या माहितीचा आधार घेत आदमपूर येथील एस-४०० प्रणाली, सूरतगड, नगरोडा येथील ब्रह्मोस बेस, देहरागिनी तोफखाना, चंडीगढमधील दारूगोळा नष्ट करण्याचे खोटे दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले. मात्र भारत हा फेक नरेटिव्ह पूर्णपणे नाकारतो आहे, असं सोफिया म्हणाल्या.नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने ड्रोन घुसखोरी आणि मोठ्या प्रमाणात गोळीबाराचे अनेक प्रयत्न केले. कुपवाडा, बारामुल्ला, पूंच, राजौरी, अखनूर सेक्टरमध्ये मोठा गोळाबार केला. मात्र भारतीय सेनेने पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाक सेनेला मोठं नुकसान केलं. पाकिस्तानच्या भागात सैनिकांची संख्या वाढत असल्याचं दिसतं आहे, मात्र त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर तयार असल्याचं कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.