दादर चौपाटी बंद राहणार? समुद्रकिनारी जाण्यास मनाई? मेसेज व्हायरल होताच मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण.

समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्य बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.मुंबई: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचे परिणाम महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दिसत आहेत. कोणतीही शहानिशा न करता मिळालेली माहिती पसरवली जात असल्याने, मुंबईला अफवांचे जोरदार हादरे बसत आहेत. साकीनाका परिसरात ड्रोन घिरट्या घालत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली. समुद्रमार्गे हल्ल्याचा धोका असल्याने दादर चौपाटी बंद केल्याची अफवा पसरली. त्यातच, टाटा रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल आल्याने घबराट पसरली.पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. दोन्ही सैन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धुमश्चक्री सुरू आहेत. सीमेबरोबरच देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशातच सर्वसामान्य नागरिकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत. सायबर पोलिसांच्या वतीने सोशल मीडियावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहाटे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन आला.

साकीनाका येथील गैबन शाहबाबा दर्ग्याजवळ ड्रोन दिसल्याची माहिती देण्यात आली. हे ड्रोन जवळच्या झोपडपट्टीत गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेत साकीनाका येथील हा परिसर पिंजून काढला. मात्र ती केवळ अफवाच असल्याचे निष्पन्न झाले.दादर चौपाटी येथे पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढले. समुद्रमार्गे सुरक्षेचा धोका असल्याने नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यास मनाई केली जात असल्याचे वृत्त अनेक वाहिन्यांवर झळकले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन असेच कोणतेच आदेश देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे दादर चौपाटीवर नागरिकांची नेहमीप्रमाणे ये-जा असल्याचे सांगण्यात आले.”सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे.

आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्य बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका,” असं आवाहन मुंबई पोलिसांनी ‘एक्स’वरून केलं आहे.दरम्यान, परळ येथील टाटा रुग्णालयास एक धमकीचा मेल आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने कळवल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वानपथकाच्या मदतीने पोलिसांनी रुग्णालयाची तपासणी केली. मात्र संशयास्पद असे आढळले नाही. धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.