बालपणी मामाने लग्न लावलं, संसार करताना घराबाहेर पडण्याची वेळ, 81 वर्षांनी जोडप्याचा पुनर्विवाह.

संतोषबाबा भामरे (वय ८५) आणि जाईबाई आहेर (८३) या दाम्पत्याची ही कहाणी समाजातील उणिवा अन् जाणिवा अधोरेखित करणारी आहे.रुढी-परंपरेनुसार ‘त्यांचा’ ८१ वर्षांपूर्वी बालविवाह झालेला.. अनेक चढ-उतारांचा सामना करीत दोघांनी संसाराचा गाडा चालवला. एकुलत्या मुलाचे लग्न लावले अन् नंतर दोघांनाही घराबाहेर पडावे लागले. मोठ्या हालअपेष्टांनंतर ‘त्यांना’ आधाराश्रमात दाखल केले गेले. आता तेथेच ‘त्यांचा’ ८१ वर्षांनंतर होणारा पुनर्विवाह कुतूहलाचा विषय बनला आहे.संतोषबाबा भामरे (वय ८५) आणि जाईबाई आहेर (८३) या दाम्पत्याची ही कहाणी समाजातील उणिवा अन् जाणिवा अधोरेखित करणारी आहे. घर सोडल्यानंतर मंदिर, फूटपाथवर त्यांना जीवन व्यतित करावे लागले. त्यांच्या यातना बघून एका सजग महिलेने त्यांना आधाराश्रमापर्यंत पोहोचविले.विशेष म्हणजे दीड वर्षापासून ही जोडी नांदुरी (ता. कळवण) येथील ज्या सप्तशृंगी आधाराश्रमात राहत आहे तेथील संचालकांनी ८१ वर्षांनंतर येत्या १८ मे रोजी त्यांचे पुन्हा एकदा लग्न अर्थात, पुनर्विवाह लावण्याचे ठरविल्याने या जोडीसोबतच इतर घटकांतही या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे कुतूहल दिसून येत आहे.

या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात वाजंत्री, मांडवावेळी स्नेहभोजन, हळदीचा कार्यक्रम, मंगलाष्टके व इतर पूजाविधी, तसेच वधू-वरांची रथ मिरवणूक आणि अगदी फोटोग्राफरची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे.संतोषबाबा हे चार वर्षांचे आणि जाईबाई अवघ्या दोन वर्षांच्या असताना तत्कालीन रुढीनुसार ८१ वर्षांपूर्वी संतोषबाबांच्या मामाने आपल्या भाच्याशी जाईबाई यांचा बालविवाह करविला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात असे बालविवाह होत आणि आयुष्यभर टिकतही असत. आता सप्तशृंगी आधाराश्रमातील दत्तकपुत्र वर संतोषबाबा (खुंटेवाडी, ता. देवळा येथील स्व. सुकदेव भावडू भामरे यांचे चिरंजीव) आणि वधू जाईबाई (निवाणे, ता. कळवण येथील स्व. वेडू तानाजी आहेर यांची कन्या)

यांचा होणारा पुनर्विवाह चर्चेचा विषय बनला आहे.दुसरीकडे, न्यायालयाने पोटगी मंजूर केली असतानाही ती बाब लपवून ठेवत २५ हजार रुपयांची अंतरिम पोटगी मागणाऱ्या पत्नीचा अर्ज पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला. उच्चशिक्षित असलेल्या आणि नामांकित फायनान्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या पत्नीने आपल्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याचे सांगून पतीकडून अंतरिम पोटगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्याचा आदेश कौटुंबिक न्यायाधीश एस. बी. यादव यांनी दिला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.