सावखेडा शिवार, जळगांव येथील कोल्हे हिल्स् परिसरातील नागरीक हे नागरी सुविधा पासून (रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट) वंचित असलेबाबत…. सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरामध्ये माऊली नगर, गोकुळ धाम नगर, विश्वकर्मा चौक, शिवबा नगर, न्यु लक्ष्मी नगर नवनाथ नगर, साईबाबा मंदिराजवळील परिसर इ. भागातील रहिवाशी हे या परिसरामध्ये मागील १२ ते १३ वर्षापासून या परिसरात कायम स्वरुपी रहात आहेत. सदरील परिसर हा गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा पालकमंत्री तथा मंत्री यांच्याच मतदार संघामध्ये येत असून त्यांचाच मतदार संघ हा अनेक नागरी सुविधां पासून वंचित राहिलेला आहे. एकीकडे गुलाबरावजी पाटील हे स्वच्छता व पालकमंत्री असूनच त्यांचेच मतदार संघात काहीएक स्वच्छता आपणास पहावयास मिळत नसल्याने ते दुसरीकडे काय स्वच्छता करतील ? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये दबक्या आवाजात बोलण्यात येत आहे.

मागील १३ वर्षापासून आम्ही या परिसरातील रहिवाशी असून आम्ही नियमित पणे सावखेडा ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व करपट्टी, घरपट्टी इ. वेळेवर भरणा करीत असतो. असे असतांना अनेक नागरी सुविधांपासून आम्ही आजपावेतो वंचित आहोत. या समस्यांबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देवूनही त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी संबंधित प्ररिसरातील नागरिक यांनी मनसे. कडे त्यांचे समस्यांबाबत निवेदन व प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. त्यानंतर सदरील परिसरामध्ये म.न.से. पदाधिकारी यांनी नागरिकांचे समस्यांबाबत प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली असता त्या परिसरात नागरिकांनी त्यांचे समस्या पुढीलप्रमाणे सांगितल्या.









