मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील अवस्था बघून मनसेने दिले निवेदन,

सावखेडा शिवार, जळगांव येथील कोल्हे हिल्स् परिसरातील नागरीक हे नागरी सुविधा पासून (रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट) वंचित असलेबाबत…. सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरामध्ये माऊली नगर, गोकुळ धाम नगर, विश्वकर्मा चौक, शिवबा नगर, न्यु लक्ष्मी नगर नवनाथ नगर, साईबाबा मंदिराजवळील परिसर इ. भागातील रहिवाशी हे या परिसरामध्ये मागील १२ ते १३ वर्षापासून या परिसरात कायम स्वरुपी रहात आहेत. सदरील परिसर हा गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा पालकमंत्री तथा मंत्री यांच्याच मतदार संघामध्ये येत असून त्यांचाच मतदार संघ हा अनेक नागरी सुविधां पासून वंचित राहिलेला आहे. एकीकडे गुलाबरावजी पाटील हे स्वच्छता व पालकमंत्री असूनच त्यांचेच मतदार संघात काहीएक स्वच्छता आपणास पहावयास मिळत नसल्याने ते दुसरीकडे काय स्वच्छता करतील ? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये दबक्या आवाजात बोलण्यात येत आहे.

मागील १३ वर्षापासून आम्ही या परिसरातील रहिवाशी असून आम्ही नियमित पणे सावखेडा ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व करपट्टी, घरपट्टी इ. वेळेवर भरणा करीत असतो. असे असतांना अनेक नागरी सुविधांपासून आम्ही आजपावेतो वंचित आहोत. या समस्यांबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देवूनही त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी संबंधित प्ररिसरातील नागरिक यांनी मनसे. कडे त्यांचे समस्यांबाबत निवेदन व प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. त्यानंतर सदरील परिसरामध्ये म.न.से. पदाधिकारी यांनी नागरिकांचे समस्यांबाबत प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली असता त्या परिसरात नागरिकांनी त्यांचे समस्या पुढीलप्रमाणे सांगितल्या.

१) हा परिसर जवळपास १२ ते १३ वर्षापासून रहिवाशी परिसर असून सुध्दा या ठिकाणी रहिवाश्यांसाठी आजपर्यंत पक्का रस्ता नसल्याने रस्त्यावर सतत पाणी जमा होत असते. त्यातच पावसाळ्याच्या दिवसात तर जागोजागी पावसाचे पाणी जमा होऊन रस्त्यावरुन वापरणेसुध्दा मुश्किल होते, अनेक वेळा टु व्हिलर, लहान मुलांच्या सायकल इ. चिखलात स्लिप होऊन छोटे मोठे अपघात होत असतात. तसेच बाजूलाच फॉरेस्ट टेकडी असून त्या ठिकाणाहून वाहत येणारे संपूर्ण पावसाचे पाणी हे वरील कॉलनीतील परिसरात येत असते त्यामुळे सदरील परिसरात कंबरेच्या बरोबर पाणीजमा होत असते.

२) सदरील परिसरातील सांडपाण्याचा निचरा होणेसाठी गटारीची व्यवस्था नाही. त्यामुळे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर बाहेर जमा होत असते व त्यावर डासांचा प्रार्दुभाव होत असल्याने           अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना डेंग्यु, मलेरीया इ. आजाराची लागण झालेली आहे.

३) सदरील परिसरातील काही भागात स्ट्रिट लाईट नसल्याने त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी वापरणे जिकरीचे होते. त्यातच आजूबाजूला शाळा असून हिवाळ्याचे दिवसात लवकर           अंधार पडत असल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी पालकांना स्वतः जावे लागत असते. तरी महोदयांना विनंती की, आमच्या परिसरातील वरील समस्यांची (१) वापरण्यासाठी पक्के       रस्ते (२) सांडपाण्याचा निचरा होणेसाठी गटारी (३) स्ट्रीट लाईट) आपण तात्काळ दखल घेऊन आमच्या परिसरास स्वतः प्रत्यक्ष भेट देवून सदरील समस्या येत्या १० दिवसाचे आत         मार्गी लावाव्यात अशी आपणास परिसरातील नागरिकांचे वतीने विनंती करीत आहोत.

टिप : सदरील समस्या मार्गी न लागल्यास आम्ही म.न.से. तर्फे परिसरातील सर्व महिला, पुरुष यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल व यामुळे काही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची कृपया दखल घ्यावी.

निवेदन देतेवेळी जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, शहराध्यक्ष किरण तडले उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, उपशहर अध्यक्ष चेतन पवार, शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा उपसंघटक साजन पाटील, शहर सचिव जितेंद्र पाटील, मनसे तालुकाध्यक्ष हेमंत कोळी, तालुका संघटक संदीप मांडोले, मनवीसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जनहित शहर सचिव भिकन शिंपी, हरिओम सूर्यवंशी, खुशाल ठाकूर, किरण सपकाळे, प्रशांत बाविस्कर, राहुल चव्हाण, दीपक राठोड, गोविंद जाधव, ऍड. सागर शिंपी, गणेश नेरकर, सागर पाटील, अविनाश जोशी, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, मिहीर सोनार, किशोर खलसे. अनिल दिघे, सोनू सोनार, रोहित चौधरी, प्रथमेश जोशी, प्रणव चव्हाण, पंकज चौधरी, ऐश्वर्य श्रीरामे, राजू डोंगरे यावल शहर अध्यक्ष गौरव कोळी किशोर नन्नवरे,

  • Related Posts

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद जळगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका…

    अजित पवार महायुतीत नसते तर… गुलाबराव पाटील असं का म्हणाले

    अजित पवार महायुतीत नसते तर… गुलाबराव पाटील असं का म्हणाले जळगाव : अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्या महायुतीत नसता तर आम्ही शिवसेना शिंदे गटाने शंभर जागा जिंकल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द