मनसेने दिले ग्रामपंचायत अधिकारी यांना निवेदन, आव्हाणे शिवारामधील सत्यम पार्क परिसरातील नागरीक. नागरी सुविधा पासून वंचित.

मनसेने दिले ग्रामपंचायत अधिकारी यांना निवेदन, आव्हाणे शिवारामधील सत्यम पार्क परिसरातील नागरीक. नागरी सुविधा पासून वंचित.


आव्हाणे शिवारातील सत्यम पार्क, सोपान नगर, आनंद नगर, शंकर्स पार्क, गोकुळधाम अपार्टमेंट भागातील रहिवाशी हे या परिसरामध्ये मागील १० ते १५ वर्षापासून या परिसरात कायम स्वरुपी रहात आहेत. सदरील परिसर हा मा. ना. गुलाबरावजी पाटील, जळगाव जिल्हा पालकमंत्री तथा मंत्री यांच्याच मतदार संघामध्ये येत असून त्यांचाच मतदार संघ हा अनेक नागरी सुविधां पासून वंचित राहिलेला आहे. एकीकडे मा. ना. गुलाबरावजी पाटील हे स्वच्छता व पालकमंत्री असूनच त्यांचेच मतदार संघात काहीएक स्वच्छता आपणास पहावयास मिळत नसल्याने ते दुसरीकडे काय स्वच्छता करतील ? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये दबक्या आवाजात बोलण्यात येत आहे.

मागील १५ वर्षापासून आम्ही या परिसरातील रहिवाशी असून आम्ही नियमित पणे आव्हाणे ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व करपट्टी, घरपट्टी इ. वेळेवर भरणा करीत असतो. असे असतांना अनेक नागरी सुविधांपासून आम्ही आजपावेतो वंचित आहोत. या समस्यांबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देवूनही त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी संबंधित परिसरातील नागरिक यांनी म.न.से. कडे त्यांचे समस्यांबाबत निवेदन व प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. त्यानंतर सदरील परिसरामध्ये म.न.से. पदाधिकारी यांनी नागरिकांचे समस्यांबाबत प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली असता त्या परिसरात नागरिकांनी त्यांचे समस्या पुढीलप्रमाणे सांगितल्या.

१) हा परिसर जवळपास १५ वर्षापासून रहिवाशी परिसर असून सुध्दा या ठिकाणी रहिवाश्यांसाठी आजपर्यंत पक्का रस्ता नसल्याने रस्त्यावर सतत पाणी जमा होत असते. त्यातच पावसाळ्याच्या दिवसात तर जागोजागी पावसाचे पाणी जमा होऊन रस्त्यावरुन वापरणेसुध्दा मुश्किल होते, अनेकदा मोटार सायकल स्लिप होऊन छोटे मोठे अपघात होत असतात.

२) सदरील परिसरातील सांडपाण्याचा निचरा होणेसाठी गटारीची व्यवस्था नाही. त्यामुळे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर बाहेर जमा होत असते व त्यावर डासांचा प्रार्दुभाव होत असल्याने अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

३) सदरील परिसरातील काही भागात स्ट्रिट लाईट नसल्याने त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी खूपच अंधार असतो व त्यामुळे रात्री वापरणे धोक्याचे होत असते.

४) पिण्याची पाण्याची आमच्या परिसरात अद्यपपर्यंत सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी नेहमी भटकंती करावी लागत असते. महोदयांना विनंती की, आमच्या परिसरातील वरील समस्यांची (१) वापरण्यासाठी पक्के रस्ते (२) सांडपाण्याचा निचरा होणेसाठी गटारी (३) स्ट्रीट लाईट, (४) पिण्याचे पाणी इ. बाबत दखल घेऊन आमच्या परिसरास स्वतः प्रत्यक्ष भेट देवून सदरील समस्या येत्या १० दिवसाचे आत मार्गी लावाव्यात अशी आपणास परिसरातील नागरिकांचे वतीने विनंती करीत आहोत. मागील दोन दिवसापूर्वी आम्ही सावखेडा शिवारातील नागरिकांचे सुविधांबाबत देखील आपणांकडे निवेदन सादर केले आहे व आज रोजी हे निवेदन सादर करीत आहे. पहिले निवेदन देते वेळी आपण सांगितले की आम्ही तांत्काळ कमेटी स्थापन करुन संमस्या सोडवू परंतु अद्यापपर्यंत कमेटी स्थापन झालेली नाही.

टिप : सदरील समस्या मार्गी न लागल्यास आम्ही म.न.से. तर्फे परिसरातील सर्व महिला, पुरुष यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल व यामुळे काही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची कृपया दखल घ्यावी.. तसेच आमच्या समस्या मार्गी न लागल्यास आम्ही सावखेडा व आव्हाणे परिसरातील नागरिक पुढील होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकू याची कृपया दखल घ्यावी.

निवेदन देतेवेळी जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, जनहित शहर सचिव भिकन शिंपी, खुशाल ठाकूर,  ऍड. सागर शिंपी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.