असिफ गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणात असून, आजवर त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मात्र, अलीकडील काही वर्षांत त्यांची ओळख केवळ वादग्रस्त विधानांपुरतीच मर्यादित राहिली आहे.‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांची बुधवारी दिवसभरातील वक्तव्ये जगभर चर्चेचा विषय ठरली आहेत. भारताची तीन लढाऊ विमाने पाडल्याचा पुरावा म्हणून सोशल मीडियाचा दाखला देण्यापासून ते दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचा पूर्वीचा पाठिंबा मान्य करण्यापर्यंत त्यांनी केलेल्या विधानांमुळे पाकिस्तानच्या दाव्यांतील हवा पुरती निघून गेली आहे.असिफ गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणात असून, आजवर त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मात्र, अलीकडील काही वर्षांत त्यांची ओळख केवळ वादग्रस्त विधानांपुरतीच मर्यादित राहिली आहे.










