भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बावचळला, भारतीय नागरिकांवर हल्ला, पूंछमध्ये 16 जणांचा मृत्यू.

भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाककडून थेट सीमेवरील नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सतत सीमारेषेवरील गावांवर गोळीबार केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.श्रीनगर: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सतत एलओसीवर गोळीबार सुरु आहे. यामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून थेट भारतीय नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पूंछमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार सुरु आहे. यात निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याची माहिती आहे. या गोळीबारात १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानने त्यावेळी गोळीबार केला जेव्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होतं.

एका सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.अधिकाऱ्यांनी ‘TOI’ला सांगितलं की, पूंछसोबतच उरी, बारामुल्ला, कर्नाह, तंगधार, मेंढर आणि राजौरी या सीमावर्ती गावांमध्येही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मंगळवारी आणि बुधवारच्या रात्री या गावांवर गोळीबार झाला, तोफगोळे डागण्यात आले. भारतीय सैन्याने पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून सतत एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गोळीबार सुरू आहे. यामध्ये रोज लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.पूंछ शहर हे एलओसीपासून फक्त २-३ किलोमीटर अंतरावर आहे, जे पीओकेच्या रावळकोटपासून अगदी जवळ आहे. तरीही आतापर्यंत कधी हे ठिकाण लक्ष्य करण्यात आलं आहे. मात्र, यावेळी पाकिस्तानकडून पूंछ लक्ष्य करण्यात आलं.पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला, मोठ्या प्रमाणात मोर्टार फायर करत लोकांवर हल्ला केला. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तर कित्येक जखमी झाले. कारण, त्यावेळी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं नव्हतं. स्थानिक रुग्णालयांनी सांगितलं की, जखमींची संख्या खूप जास्त आहे.TOI’ला मिळालेल्या माहितीनुसार, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची योजना आधीच तयार होती. गावांमध्ये सुरक्षित बंकर बांधले होते. शाळेत आणि इतर इमारतींमध्ये लोकांना ठेवण्याची सोय करण्यात आली होती. तसेच, पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन सैन्यही LoC वर तैनात करण्यात आलं होतं. मात्र, नागरिक सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याआधीच पाकिस्तानी सैन्याने LoC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्य आणि बीएसएफने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.