एअर डिफेन्स सिस्टम नष्ट, ड्रोल हल्ले निष्क्रिय… पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं प्रत्युत्तर, रात्रभरात काय घडलं.

पाकिस्तानने भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले, पण भारताने ते परतवून लावले. भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत एस-४०० क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे AWACS आणि एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केलं. तसंच भारताने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ ठरवले.पाकिस्तानने जम्मू, जैसलमेर आणि पठाणकोटसह भारतातील काही शहरांमध्ये मिसाईल आणि ड्रोनद्वारे अनेक हल्ले केले. पण पाकचे हे हल्ले भारतीय लष्कराने हाणून पाडले. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर, सियालकोट आणि रावळपिंडीलाही भारतीय सैन्याने लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, भारतीय शहरांवर पाकिस्तानच्या अयशस्वी हल्ल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर, जम्मू आणि राजौरी, पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर,

गुजरातमधील भूज आणि सीमेला लागून असलेल्या इतर प्रमुख भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आलं होतं.गुरुवारी रात्री उशिरा, पाकिस्तानी सैन्याने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांना क्षेपणास्त्रं आणि ड्रोनने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हाणून पाडला. पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडण्यासाठी भारताने एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं आणि एकात्मिक मानवरहित विमानविरोधी प्रणालीचा वापर केला. भारताने पाकिस्तानचं हाय-टेक AWACS नष्ट केलं आहे.पाकिस्तानच्या चिथावणीला भारताने योग्य उत्तर दिलं आणि पहाटे लष्करी कारवाई सुरू केली.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य केलं आणि लाहोरमध्ये एक हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली.भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राइक केला. त्यानंतर पाकिस्तानकडून ८ मेच्या रात्री अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज अशा १५ ठिकाणांवर लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय सेनेने हे हल्ले निष्क्रिय केले.इस्लामाबादमधील पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी लाहोर, गुजरांवाला, चकवाल, बहावलपूर, मियानो, कराची, चोर, रावळपिंडी आणि अटक येथे भारतीय ड्रोन हल्ल्यांबद्दल सांगितलं. भारताने केलेले हे हल्ले निष्प्रभ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.