टिटवाळा परिसरात एका २१ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. आजीसोबत भांडणानंतर मैत्रिणीच्या घरी आश्रयाला गेलेल्या तरुणीला मैत्रिणींनी नशेचे इंजेक्शन देऊन कोंडून ठेवले. तिच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तब्बल ३८ दिवस तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे. टिटवाळा बल्याणी परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा घरात आजीबरोबर वाद झाल्याने ती घर सोडून कामावर ओळख झालेल्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली. मात्र या मैत्रिणीने तिचा गैरफायदा घेत दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला नशेचे इंजेक्शन देत कोंडून ठेवले. तर मैत्रिणीच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तिच्यावर तब्बल ३८ दिवस बलात्कार केल्याप्रकरणी टीटवाळा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.










