पाकला मदत केली अन् जगासमोर इभ्रत गेली; चीनवर सलग दुसऱ्या दिवशी नामुष्की, भारताचा धडाका.

ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं जोरदार दणका दिला आहे. भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला.नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं जोरदार दणका दिला आहे. भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला. पण भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पडले. भारतानं प्रथमच एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर केला. ही यंत्रणा भारतासाठी गेमचेंजर ठरली आहे. तर दुसरीकडे भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.ऑपरेशन सिंदूरनं हादरलेल्या पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्ताननं भारताच्या १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण भारतीय सैन्यानं हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. अवंतीपूर, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, कपुरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदिगढ, नाल, फलौदी, उत्तर लाई, भुजमध्ये हल्ल्याचे प्रयत्न झाले. पण भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरवले. भारतानं तैनात केलेली एस-४०० यंत्रणा १५ शहरांसाठी अक्षरश: वरदान ठरली.

दुसरीकडे भारतीय सैन्यानं ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून पाकिस्तानला हादरवलं. शेजारी देशाच्या १२ शहरांमध्ये हल्ले झाले. पाकिस्तानच्या एचक्यू-९ हवाई सुरक्षा यंत्रणेला भारताचे ड्रोन हल्ले रोखता आले नाहीत. पाकिस्तानला एचक्यू-९ यंत्रणा चीननं दिलेली आहे. भारताच्या ड्रोन हल्ल्यात ही यंत्रणाच उद्ध्वस्त झाली. त्यामुळे एकाच फटक्यात भारतानं पाकिस्तान आणि चीनला धडा शिकवला. चिनी बनावटीच्या एचक्यू-९ हवाई सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा यामुळे उघड झाल्या.भारताच्या धडक कारवाईमुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली. यासोबतच चीनच्या हवाई सुरक्षा यंत्रणेचेदेखील वाभाडे निघाले. त्यामुळे जगासमोर चीनची नाचक्की झाली आहे. पाकिस्तानला भारताचे हवाई हल्ले रोखता न आल्यानं चीनची इभ्रत गेली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांत दुसऱ्यांदा पाकिस्तानमुळे चीनवर नामुष्की ओढवली. काल भारतानं पाकिस्तानचं जेएफ-१७ हे लढाऊ विमान पाडलं. हे विमान पाकिस्तानला चीननंच दिलेलं होतं.पाकिस्ताननं याआधी ६ वर्षांपूर्वी भारतासोबत संघर्ष करताना अमेरिकेवर नामुष्की आणली होती. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं बालाकोटवर एअर स्ट्राईक केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानची लढाऊ विमानं भारतीय हद्दीत शिरली. त्यांना पिटाळण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं हवेत झेपावली. तेव्हा मिग-२१ बायसन उडवणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी अमरार क्षेपणास्त्र डागत पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-१६ विमान पाडलं. मिग-२१ च्या तुलनेत एफ-१६ अत्याधुनिक विमान मानलं जातं. हे विमान पाकिस्ताननं अमेरिकेकडून घेतलं होतं. पण भारताविरूद्धच्या चकमकीत मिग-२१नं एफ-१६ पाडल्यानं अमेरिकेची नाचक्की झाली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.