भीषण अपघात! ट्रेलर आणि एसटीची जोरदार धडक; बस एका बाजूने अक्षरश: चिरली अन् चार जण दगावले.

 रायगडच्या तळा तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. ट्रेलर आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. गुरुवार ८ मे ला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.रायगडच्या तळा तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. ट्रेलर आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. गुरुवार ८ मे ला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० पेक्षा अधिकजण जखमी झाल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून पंचनामा सुरु आहे.

वृत्तानुसार, तळयाकडून अगरदांडयाच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरने रहाटाड कडून येणाऱ्या एसटीबसला जोरदार धडक दिली. तारणे येथील तीव्र वळणावर हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भयानक होता की, एसटी बस एका बाजूने पूर्णपणे चिरली गेली. सदरच्या अपघाताची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालय दाखल करण्यात केले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, तृप्ती विजय खुटीकर, (22 वर्षे) रा. रहाटाड कोळीवाडा, लक्ष्मण राया ढेबे (38 वर्ष) रा. धनगरवाडी, अनन्या कपेश गमरे (7 वर्ष) रा. आंबेत, विठ्ठल धोंडू कजबते (55 वर्ष) रा. खांबवली अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रवाना केले आहेत.तर, काशिनाथ जानू ढेबे रहाटाड (वय 52), सविता शांताराम गायकवाड (वय 45) खांबवली, यशवंत नारायण रामाणे (वय 77) भोईवाडी तळा, लक्ष्मण नाग्या घायरी (वय 60) रहाटाड कोळीवाडा, सविता शांताराम गायकवाड तंग (वय 45) खांबवली, वैष्णवी विजय फुटेकर (वय 25) खांबवली तळा, ससुबाई तुकाराम गायकवाड (वय 25) रहाटाड तळा, जयश्री नामदेव गवाणे (वय 60) रहाटाड तळा, संगीता अंकुश जाधव (वय 40) रहाटाड तळा, मोरेश्वर ढेबे (वय 19) हे गंभीर जखमी झाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.