आई घरी दिसेना, मुलगा शोधायला गेला अन् पायाखालची जमीनच सरकली; विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह.

मुलाने शेतातील विहिरीत डोकावून बघितले असता सविता यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगता आढळून आ घरातील काम आटोपून शेतात कामानिमित्त गेलेली ३५ वर्षीय महिला घरी परतलीच नाही. मुलाने शेतात जाऊन शोधाशोध केली असता विहिरीत आईचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील भालगाव या गावात उघडकीस आली. सदर महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, हे गूढ अद्याप कायम आहे. सविता रमेश कोलते (वय ३६, रा. भालगाव, ता. फुलंब्री) असं मृतदेह आढळलेल्या महिलेचं नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता या भालागाव येथे पती, मुलगा, मुलगी, सासू, सासरे असे कुटुंबासह वास्तव्यास होत्या. दरम्यान,बुधवारी घरातील काम आटोपून सकाळी १० वाजता सविता या शेतात जाते म्हणून गेल्या. मात्र बराच वेळ होऊन गेला तरीही सविता या घरी परतल्या नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. काही वेळाने मुलगा शेतात शोध घेण्यासाठी गेला. त्याने शेतातील विहिरीत डोकावून बघितले असता सविता यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगता आढळून आला. आईचा मृतदेह तरंगताना बघून मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तत्काळ ही माहिती कुटुंबीयांना दिली.घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना कळताच जमादार अंकुश बागल, सुनीता दाभाडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने सविता यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. डॉक्टरांनी तपासून सविता यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. भालगाव येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, सविता कोलते यांच्या पश्चात पती,मुलगा,मुलगी,सासू सासरे असा परिवार आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी टाहो फोडला.सविता यांच्या मृत्यूची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी याबाबत हळहळ व्यक्त केली. सविता यांची ही आत्महत्या आहे की त्यांची हत्या करण्यात आली, याचे गूढ अद्याप कायम आहे. या घटनेचा पुढील तपास वडोद बाजार पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.