ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; सरकारचं मोठं विधान, भारताचा पुढचा प्लॅन काय?

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.भारतीय सेना सातत्याने दहशतवाद्यांवर कारवाई करत आहे. अशी माहिती केंद्रीय किरेन रिजिजू यांनी दिली आहे.भारत सरकारचे संसदीय मंत्री यांनी एक महत्त्वाच विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.भारतीय सेना सातत्याने दहशतवाद्यांवर कारवाई करत आहे. सर्वपक्षीय बैठकनंतर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की सर्वपक्षीय बैठकीची अध्यक्षता सरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केली. त्यावेळी त्यांनी सर्व नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. सर्व नेत्यांनी सशस्त्र दलांचे कौतुक करत आम्ही सरकारच्या आणि सेनादलांच्या सोबत खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

याशिवाय केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की विरोधी पक्षांकडून काही सूचना मिळाल्या ज्या सरकार गंभीरतेने घेईल. त्यांनी सांगितले की संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की, आम्ही सरकार केवळ शासन करण्यासाठी नसते तर देशसेवेसाठी स्थापित करतो. ऑपरेशन सिंदूरवरुन सर्व दलांनी एका सुरात भारतीय सेनेचे अभिनंदन केले.मीडिया रिपोर्टनुसार सरकारने या बैठकीत एक मोठा खुलासा केला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.दरम्यान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यात बैठक सुरू होती. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने होत असलेल्या युद्धबंदी उल्लंघनाच्या आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्युत्तर कारवाईवर चर्चा करण्यात आली. भारतात होणाऱ्या दहशतवादी शक्यता लक्षात घेता सुरक्षादलांना सर्तक राहण्यास सांगितले आहे.ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला अद्दल घडवली आहे. त्यामुळे पाकिस्तान हडबडला आहे. सीमाभागात सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार करत आहे. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा पुछ येते गोळीबार करण्यात आला काही नागरिकांचाही यात मृत्यू झाला. भारताच्या 15 शहरांवर पाकिस्तानचा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. श्रीनगर अवंतीपुरा, अमृतसर येथे हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. भारताने याविरोधात चोख प्रत्यूत्तर दिले आहे. पाकची एअर डिफेन्स सिस्टमही भारताने नष्ट केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.