चोपडा तालुक्यात 12 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या..

चोपडा तालुक्यात 12 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या..

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी चोपडा तालुक्यातील विरवाडा येथील एका शेतमजुराच्या चार अल्पवयीन मुली स्वतः च्या शेतातून काम करून घराकडे परतत असताना १३ वर्षीय मुलीला नराधमाने शेतात ओढून नेत अमानुषपणे बलात्कार करून चेहरा दगडाने ठेचून खून केल्याची हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.संशयित आरोपी मुकेश पुन्या बारेला मुळचा रा.बलवाडी ता.वरला जि.बडवानी सध्या रा.पाटचारीजवळ चोपडा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत एलसीबी पथक, डॉग स्कॉड पथक , फॉरेन्सिक पथक,चाळीसगाव विभागाचे अॕडीशनल एस पी., चोपडा विभागाचे पोलीस अधिकारी, घटना स्थळी दाखल होऊन तपासचक्रे फिरवत होती. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चोपडा उप जिल्हा रुग्णालयाकडे शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी 8 वाजेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत परिसरातून प्राप्त माहिती अशी की,काल दि.7/8/2024 रोजी सायंकाळच्या 4ते5 वाजेच्या सुमारास अल्पवयीन आठ व दहा व १३ वर्षीय आणि एक वय माहीत नाही अशा चार बहिणी स्वतः च्या शेतातून काम करून घराकडे परत येत असताना त्यातील १३ वर्षीयअल्पवयीन मुलींस संशयित आरोपी मुकेश पुन्या बारेला याने वाघ्या नाल्याकडे पकडून ओढून नेले असता अन्य तिघं बहिणी घाबरून गावाकडे धाव घेऊन गावात पोहचल्या अन् घडलेला प्रकार सांगितला . त्यानंतर गावातील ४०/५०लोक जमून शेत परिसरात तिचा शोध घेत असतांना सदरील मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत, चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत विरवाडे शेत शिवारातील भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीचे पीकात आढळून आला.

ही वार्ता वाऱ्यासारखी गावात येऊन धडकताच गावावर शोककळा पसरली. याबाबत पोलिस सुत्रांना माहिती मिळताच फौज फाट्यासह घटना स्थळी दाखल झाले काही तासांतच संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून मृतदेह चोपडा उप जिल्हा रुग्णालयाकडे शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.घटना स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक माळेश्वर रेड्डी अप्पर, चाळीसगाव परिमंडळ पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड ,पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय एकनाथ भिसे ,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे यांनी भेट दिली. याप्रकरणी हामा सुमला बारेला याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात आरोपी मुकेश पुन्या बारेला याच्या विरुद्ध भाग -5 cctns 454 / 2024 भारतीय न्याय संहिता कलम 65, 66 ,103 पास्को 4 ,8, 12 प्रमाणे पुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोनि कावेरी कमलाकर हे करीत आहे

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.