आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची महाराष्ट्राचे मुख्य सचिव व विभागीय आयुक्त यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी.

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची महाराष्ट्राचे मुख्य सचिव व विभागीय आयुक्त यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी हेमकांत गायकवाड,(जळगाव जिल्हाध्यक्ष -भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य तसेच जळगांव जिल्हा सचिव-मानव विकास पत्रकार संघ)

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी चोपडा येथील रामपुरा,कैकाडी वाडा भागातील रहिवासी हेमकांत बळीराम गायकवाड जळगाव जिल्हाध्यक्ष –
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य तसेच जळगांव जिल्हा सचिव-मानव विकास पत्रकार संघ
यांनी शासन परिपत्रकानुसार दि.२८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी

माहिती अधिकार हा कायदा नागरिकाना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे.तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जमाबदारी आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८ पत्र क्र.३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय,मुंबई दिनांक २० सप्टेंबर शासन निर्णय आहे.सदर निर्णयानुसार दर वर्षी शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश आहे.या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे शासनाने सुचविलेले आहे.त्याची आपल्या शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी.या वर्षी २८ सप्टेंबर २०२४ या ‘दिवशी शनिवार आहे.त्यामुळे २८ सप्टेंबर २०२४ रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २६ सप्टेंबर २०२४ किंवा २७ सप्टेंबर २०२४ या दिवशी साजरा करावा तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व कार्यालयांना तातडीने कराव्यात.अशा मागणीचे हेमकांत गायकवाड,जळगाव जिल्हाध्यक्ष – भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य तसेच जळगांव जिल्हा सचिव-मानव विकास पत्रकार संघ यांनी एका पञकान्वे ई.मेल द्वारा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.