जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, नागरी वस्त्यांना लक्ष्य; भारतीय सैन्याचं जशास तसं उत्तर.

 भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी एअर स्ट्राईक केला, त्यामध्ये ९ दहशतवादी तळांचा खात्मा करण्यात आला. यानंतर पाकिस्तानकडून सतत सीमारेषेवरीव गावांना लक्ष्य करत गोळीबार केला जात आहे.भारताने दहशतवादाला संपवण्यासाठी पहिलं पाऊल उचललं असून ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांचा खात्मा केला. मात्र, याने पाकिस्तानने काहीही धडा घेतलेला दिसत नाही. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सतत एलओसीवर गोळीबार केला जात आहे. यामध्ये १२ पेक्षा जास्त भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जखमी झाले होते. आज पुन्हा पाकिस्तानकडून गोळीबार केला गेला. गुरुवारी (८ मे) रात्री पाकिस्तानकडून तोफगोळे डागण्यात आले, गोळीबार करण्यात आला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने मध्यरात्रीनंतर कर्नाह भागातील नागरिकांच्या वस्तीला लक्ष्य केले. त्यांनी तिथे तोफगोळे डागले आणि मोर्टार सोडण्यात आले.

भारतीय सैन्याने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हल्ला सुरू होताच कर्नाह भागातील बहुतेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. याआधी पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय जवानाचा मृत्यू झाला होता.पाकिस्तानने एअर स्ट्राईकनंतर सीमेवरून गोळीबार सुरूच ठेवला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह भागात हा गोळीबारी झाला. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलं. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा अड्डा असलेल्या बहावलपूरचाही यात समावेश होता.

भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याने बुधवारी पहाटे पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांतील गावांवर मोठ्या प्रमाणात मोर्टार आणि गोळीबार केला. कृष्णा घाटी, शापूर, मनकोट (पूंछमध्ये) आणि लाम, मंजाकोटे आणि गंभीर ब्राह्मणा (राजौरीमध्ये) येथे गोळीबार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यांपूर्वी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. भारतीय सैन्याच्या माहितीनुसार, या ऑपरेशनचा उद्देश दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांना नष्ट करणे हा होता. जेणेकरून त्यांचा हेतू हाणून पाडला जाईल. बुधवारी (७ मे) पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमध्ये १२ पेक्षा जास्त नागरिक मारले गेल्याची माहिती आहे. तर, अनेक जण जखमी झाले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.