सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गंभीर जलसंकट, केवळ ३५ दिवसांसाठी पुरेल इतकाच साठा.

 सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गंभीर जलसंकट निर्माण झालं आहे. रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून, खानपूर धरणातील पाणीसाठा केवळ ३५ दिवसांसाठी पुरेल इतकाच शिल्लक आहे. येत्या १५ दिवसांत पाऊस न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.पाकिस्तानने पहलगाममध्ये पर्यटकांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणं. आता भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्याचा परिणाम पाकिस्तानवर दिसू लागला आहे. सिंधू पाणी करार रद्द केल्याच्या काही दिवसांतच रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये पाण्याचं संकट वाढत चाललं आहे. खानपूर धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणात सध्या शिल्लक असलेलं पाणी केवळ ३५ दिवसांपर्यंतच पुरू शकेल.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढी १० ते १५ दिवसांत पाऊस झाला नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते. जलाशयाच्या अनेक भागात खडक दिसू लागले आहेत. न्यूज१८ च्या वृत्तानुसार, जल आणि वीज विकास प्राधिकरणाच्या (WAPDA) अधिकाऱ्याने सांगितलं की, मंगळवारी, ७ मे रोजी धरणाची पाण्याची पातळी १,९३५ फूट इतकी नोंदवली गेली आहे. ही पातळी १,९१० या डेड पातळीच्या केवळ २५ फूट जास्त आहे. त्याशिवाय परिसरात कमी पाऊस आणि दुष्काळामुळे पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक झरेही कोरडे पडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.डॉनच्या एका रिपोर्टनुसार, पाऊस लवकर झाला नाही, तर धरणाची पाणी पातळी आणखी खाली जाईल.

यामुळे रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये पिण्याची पाण्याची कमतरता भासेल आणि त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हे धरण इस्लामाबादपासून जवळपास ४० किमी दूर आणि हरिपूरपासून १५ किमी दूरवर आहे.६ मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया अॅट २०४७ या शिखर संम्मेलनात संबोधित करताना सांगितलं, की भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं. आता भारताचं पाणी भारताच्याच हक्काचं राहिल. भारताच्या हक्कात राहिल आणि भारताच्याच कामी येईल.त्यांनी पाकिस्तानने केलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू करार रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा या शिखर संम्मेलनात पाकिस्तानविरोधात हे विधान केलं होतं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.