एका खोलीत नातवाची, तर दुसऱ्या खोलीत लेकाची बॉडी; वृद्ध बापाचा टाहो, पालघरमध्ये भयंकर घडलं.

पालघरमध्ये एकाच घरात दोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. एका खोलीत मुलाचा तर दुसऱ्या खोलीत वडिलांचा मृतदेह पडलेला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.वडिलांनी आपल्या 15 वर्षांच्या मुलाची हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना जव्हार तालुक्यात घडली आहे. आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय 15) असे मृत मुलाचे व शरद रघुनाथ भोये (वय 40) जीवन संपवणाऱ्या वडिलांचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत परिसरात राहणारे शरद रघुनाथ भोये मुंबई येथे बेस्ट सेवेमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत होते.

शरद भोये यांचे वडील रघुनाथ जानू भोये बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिंपळशेत होळीची माळी येथील त्यांच्या शेतावरील घरी गेले असता त्यांना एक धक्कादायक चित्र घरात दिसून आले. त्याचा पंधरा वर्षाचा नातू भावेश याचा मृतदेह घरात पडला होता आणि दुसऱ्या खोलीत त्याचा मुलगा शरद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जव्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोनही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद भोये यांनी पिंपळशेत परिसरातील होळीची माळी येथे शेतावरील घरात स्वतःच्या मुलाचे जमिनीवर डोके आपटून दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर नायलॉन दोरीच्या सहाय्याने घरातील दुसऱ्या खोलीत लोखंडी अँगलला गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली. शरद भोये यांनी मुलगा भावेश याची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी भोये यांच्या कुटुंबीयांची देखील पोलिस चौकशी करण्यात येत असून अधिक तपास जव्हार पोलीस करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.