‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या नरसंहाराचा बदला आज घेण्यात आला. या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या नरसंहाराचा बदला आज घेण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी स्थळं बेचिराख केली आहेत. विशेष म्हणजे दहशतवादाचे स्थळांना उद्धवस्त करुन पाकिस्तानला मोठा हादरा दिला आहे. या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.

डोवाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार तथा परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, युकेचे सल्लागार जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे सल्लागार मुसैद अल ऐबन, संयुक्त अरब अमिरातीचे सल्लागार शेख तहनून आणि महासचिव अली अल शम्सी आणि जपानचे सल्लागार मसाटाका ओकानो यांच्याशी संवाद साधला आहे. यासोबतच त्यांनी ऱशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनीही भारताच्या या क्षेपणास्त्र हल्ल्याबद्दल कल्पना दिली आहे.डोवाल यांनी चीनलाही या हल्ल्याबाबत अवगत केले आहे. त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री आणि फ्रांसचे राष्ट्रपती इमैनुएल बोने यांच्या राजकीय सल्लागाराशीही संपर्क साधला आणि त्यांना या हल्ल्याबाबत माहिती दिली. यामध्ये अजित डोवाल यांनी समकक्षीय लोकांशी संवाद साधून भारताच्या या धडक कारवाई आणि निष्पन्नतेच्या पद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.भारताने ही धडक कारवाई केल्यानंतर देशवासियांमध्ये अभिमानाची भावना आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या या संयुक्त कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच क्षेपणास्त्र हल्ला झालेल्या काही वेळातच अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. डोवाल यांनी त्यांना भारताच्या या कारवाईबद्दल सविस्तर माहिती दिली. अमेरिकेतली भारतीय दुतावासाने यासंदर्भात माहिती दिली आहे.दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी भारतासोबतच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराशीही संवाद साधला. यावेळी रुबियो यांनी दोन्ही देशांतील संवादाचे रस्ते खुले ठेवण्यास सांगितले आणि यावरुन तणाव वाढू न देण्यासही प्राधान्य देण्याचे सांगितले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.