मुलीचा नातेवाईक योगेश यशवंत दूटे याच्याविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नवनाथ तुकाराम पडवळे (रा.पांगरी, अकोले) असं हत्या झालेल्या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. नवनाथ पडवळे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पळसुंदे गावात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र केवळ प्रेमसंबंधामुळे त्याला निर्दयपणे लाकडी दांडक्याने मारहाण करत खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे.नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला आणि नव्या आयुष्याला सुरुवात करू पाहणारा नवनाथ, त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असता, तिच्याच नातेवाईकाने नवनाथवर प्राणघातक हल्ला करत त्याचा जीव घेतला. याप्रकरणी मुलीचा नातेवाईक योगेश यशवंत दूटे याच्याविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










